AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs SRH : इशानची वादळी खेळी, हैदराबादचं पहिल्याच सामन्यात द्विशतक, आरसीबीसमोर 202 धावांचं आव्हान

Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad : इशान किशन याने कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध 80 धावांची तडाखेदार खेळी केली. हैदराबादने या खेळीच्या जोरावर आरसीबीसमोर 202 धावांचं आव्हान ठेवलं आहे.

RCB vs SRH : इशानची वादळी खेळी, हैदराबादचं पहिल्याच सामन्यात द्विशतक, आरसीबीसमोर 202 धावांचं आव्हान
Ishan Kishan Srh Captain IPL 2026Image Credit source: IPL X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 28, 2026 | 10:29 PM
Share

सनरायजर्स हैदराबाद टीमने आयपीएल 2026 स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात 200 पार मजल मारली आहे. हैदरबादाने गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर 202 धावांचं मजबूत आव्हान ठेवलं आहे. हैदराबादला 200 पार पोहचवण्यात कॅप्टन ईशान किशन याने प्रमुख भूमिका बजावली. इशानने कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात 80 धावांची खेळी केली. तर अखेरच्या क्षणी अंकित वर्मा याने 43 धावांचं योगदान देत फिनिशिंग टच दिला. हैदराबादने अशाप्रकारे 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 201 धावा केल्या. त्यामुळे आता हैदराबाद गतविजेत्या संघाला रोखण्यात यशस्वी ठरणार की आरसीबी विजयी सलामी देत विजयी सलामी देणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

आरसीबीचा फिल्डिंगचा निर्णय

आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदार याने टॉस जिंकून हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं. जेकब डफी याने कॅप्टन रजतचा बॉलिंग करण्याचा निर्णय योग्य ठरवला. एकटया डफीने हैदराबादला पहिले 3 झटके दिले. अभिषेक शर्मा 7, ट्रेव्हीस हेड 11 आणि नितीश कुमार रेड्डी याने 1 धाव करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे हैदराबादची स्थिती 3 आऊट 29 अशी झाली.

इशान-क्लासेनची निर्णायक भागीदारी

आरसीबीने दिलेल्या झटपट 3 झटक्यांमुळे हैदराबाद अडचणीत सापडली होती. मात्र त्यानंतर हेन्रिक क्लासेन आणि कॅप्टन ईशान किशन या दोघांनी कमाल केली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी निर्णायक भागीदारी केली. क्लासेन आऊट झाल्याने ही जोडी फुटली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 53 बॉलमध्ये 97 रन्सची पार्टनरशीप केली. या भागीदारीमुळे हैदराबाद चांगल्या स्थितीत पोहचली. क्लासेनने 22 बॉलमध्ये 31 रन्स केल्या.

इशान किशन याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. इशानने 38 बॉलमध्ये 80 रन्स केल्या. तर अनिकेत वर्मा याने 18 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 3 फोरसह 43 रन्स केल्या. तर इतरांनी दिलेल्या योगदानामुळे हैदराबादने 201 धावा केल्या. हैदराबादची 2024 पासून 200 पेक्षा अधिक धावा करण्याची ही 12 वी वेळ ठरली.

आरसीबीसाठी जेकब डफी रोमरियो शेफर्ड या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवल्या. तर भुवनेश्वर कुमार, अभिनंदन सिंह आणि सुयश शर्मा या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

आरसीबी जिंकणार?

दरम्यान आरसीबीने आयपीएलमध्ये 3 वेळा 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केलाय. आता आरसीबी चौथ्यांदा 200 पार मजल मारून विजयी सुरुवात करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल