AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणार रिंकु सिंह, असा असेल संघ; पुन्हा चॅम्पियन ठरणार?

Duleep Trophy 2026: 23 ऑगस्ट 2026 पासून दुलीप ट्रॉफी स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेपासून देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांचं नवं पर्व सुरू होणार आहे. मागच्या पर्वात रजत पाटीदारच्या नेतृत्वात सेंट्रल झोनने किताब जिंकला होता. आता पुन्हा एकदा नव्या पर्वासाठी सज्ज झाला आहे.

रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणार रिंकु सिंह, असा असेल संघ; पुन्हा चॅम्पियन ठरणार?
रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणार रिंकु सिंह, असा असेल संघ; पुन्हा चॅम्पियन ठरणार?Image Credit source: Rajat Patidar Twitter
| Updated on: Aug 01, 2026 | 9:19 PM
Share

देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांना दुलीप ट्रॉफी स्पर्धेपासून सुरूवात होणार आहे. 23 ऑगस्ट 2026पासून दुलीप ट्रॉफी स्पर्धेचं नवं पर्व सुरू होत आहे. ही स्पर्धा बंगळूरु येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) येथे आयोजित केली गेली आहे. येथे तीन वेगवेगळी मैदाने आहेत आणि मागच्या पर्वातही ही स्पर्धा तिथेच खेळवली गेली होती. पाच वेगवेगळ्या विभागांमध्ये खेळली जाणारी प्रथम श्रेणी स्पर्धा आहे. यासाठी सर्व संघांची घोषणा करण्यात असून यंदाच्या पर्वात कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे. गजविजेत सेंट्रल झोन यंदाच्या पर्वात जेतेपद राखण्यासाठी उतरणार आहे. या झोनचं नेतृत्व पु्न्हा एकदा रजत पाटीदारच्या खांद्यावर आहे. आयपीएल स्पर्धेतही त्याच्या नेतृत्वात आरसीबीने सलग दोनदा जेतेपद मिळवलं होतं. त्यामुळे दुलीप ट्रॉफी स्पर्धेतही तशाच कामगिरीची अपेक्षा क्रीडाप्रेमींना आहे. असं असताना रजत पाटीदार असलेल्या संघात स्टार फिनिशर रिंकु सिंह देखील आहे.

दुलीप ट्रॉफीत सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळणार?

रजत पाटीदारच्या नेतृत्वात असलेल्या सेंट्रल झोन संघाला मजबुती देण्यासठी उत्तर प्रदेशच्या स्टार फलंदाज रिंकु सिंहची निवड केली आहे. यासह अष्टपैलू सारांश जैनचाही संघात समावेश आहे. त्याची निवड भारतीय कसोटी संघात झाली आहे. तर टीम इंडियात डेब्यू केलेल्या यश ठाकुर आणि हर्ष दुबे यांनाही संघात स्थान दिलं आहे. यासह श्रीलंका दौऱ्यात इंडिया ए संघाचा भाग असलेल्या अमन मोखारे, आयुष पांडे आणि जीशान अन्सारी संघात आहेत.

सेंट्रल झोन थेट उपांत्य फेरीत खेळणार

सेंट्रल झोनने गेल्या पर्वात साऊथ झोनचा पराभव करून जेतेपद पटकावले होते. गतविजेते असल्यामुळे यंदा त्यांना पहिल्या फेरीत ‘बाय’ मिळाला असून थेट सेमीफायनल सामना खेळणार आहेत.त्यांचा हा पहिला सामना ३० ऑगस्ट 2026 रोजी बेंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे होईल. रजत पाटीदारचे शांत नेतृत्व, रिंकू सिंगचा आक्रमक अंदाज आणि थेट सेमीफायनल खेळण्याची संधी मिळाल्याने यंदा सेंट्रल झोनचा संघ जेतेपदाचा सर्वात मोठा दावेदार मानला जात आहे

सेंट्रल झोन संघ : रजत पाटीदार (कर्णधार), रिंकू सिंह (उपकर्णधार), आर्यन जुयाल (विकेटकीपर), सारांश जैन, अमन मोखारे, कुणाल चंदेला, जीशान अंसारी, आर्यन पांडे, अरशद खान, आयुष पांडे, यश राठौड़, हर्ष दुबे, कुणाल सिंह राठोड (विकेटकीपर), यश ठाकुर आणि नचिकेत भूते.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल