अंपायरकडून चूक झाली की ऋषभ पंतने चिटींग केली, शाहरुख खानच्या स्टंपिंगवरून गदारोळ

| Updated on: Apr 17, 2024 | 10:34 PM

आजचा IPL सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. दिल्लीच्या संघाला ९० धावांचे लक्ष्य मिळाले होते. दिल्लीने हा सामना सहज जिंकला. पण त्यांनी ४ विकेट गमवले.

अंपायरकडून चूक झाली की ऋषभ पंतने चिटींग केली, शाहरुख खानच्या स्टंपिंगवरून गदारोळ
Follow us on

GT vs DC : गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यात गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. गोलंदाजांसोबतच संघाचा कर्णधार आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतनेही अप्रतिम कामगिरी केली. त्याने सामन्यात गुजरातच्या दोन खेळाडूंना स्टपिंग करत आऊट केले. पण यासोबतच वादही निर्माण झाला होता. शाहरुख खानने ट्रिस्टन स्टब्सच्या चेंडूवर स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता, पण तो पूर्णपणे हुकला. ऋषभ पंत विकेटच्या मागे तयारच होता. त्याने लगेचच स्टपिंग करत त्याला आऊट केले. परंतु व्हिडिओ रिप्लेमध्ये असे दिसून आले की स्टंपिंगच्या वेळी पंतच्या हातात बॉल नव्हता. प्रकरण खूपच गुंतागुंतीचे झाले होते. अशा परिस्थितीत थर्ड अंपायरने वेगवेगळ्या अँगलने पाहून शाहरुख खानला बाद घोषित केले.

ऋषभ पंतने चिंटींग केली का?

ऋषभ पंतने स्टंपिंगच्या वेळी चिंटींग केल्याचं सोशल मीडियावर बोललं जात आहे. जरी व्हिडिओ रिप्लेमध्ये असे दिसून आले की चेंडू त्याच्या हातातून निघून गेला तोपर्यंत त्याने त्याच्या ग्लोव्हजसह विकेटला स्पर्श केला होता. अशा स्थितीत ऋषभ काही मायक्रो सेकंदांच्या कालावधीत स्टंपिंग करण्यात यशस्वी ठरला. अशा परिस्थितीत ऋषभ पंतने कोणत्याही प्रकारे चिटींग केल्याची किंवा पंचाची काही चूक झाली असे म्हणता येणार नाही.

गुजरात टायटन्सचा संघ फ्लॉप

दिल्लीच्या मारक गोलंदाजीसमोर गुजरात टायटन्सचा संघ चांगलाच फ्लॉप झाला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरातचा संपूर्ण संघ 17.3 ओव्हरमध्ये फक्त 89 धावा करू शकला नाही. दिल्लीकडून मुकेश कुमारने सर्वाधिक तीन विकेट घेतले. याशिवाय इशांत शर्मा आणि ट्रिस्टन स्टब्स यांनीही प्रत्येकी दोन विकेट घेतले तर अक्षर पटेल आणि खलील अहमद यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.

कर्णधार ऋषभ पंत (16) आणि सुमित कुमार (9) यांनी अवघ्या 8.5 षटकांत लक्ष्य गाठले आणि दिल्लीचा 6 विकेट राखून विजय मिळवला.
रशीद खानने दिल्लीला येताच धक्का दिला. अभिषेक पोरेल (15) याने काही मोठे फटके खेळले आणि संघाला 60 धावांच्या पुढे नेले पण वॉरियरने त्याला बोल्ड केले. वेगवान गोलंदाज संदीप वॉरियरने गुजरातकडून पहिला सामना खेळत पृथ्वी शॉला बाद केले.