TNPL 2023 : क्रिकेटच्या मैदानातले नवीन ‘जय-वीरु’, दे दणादण 6,6,6,6,6, एका ओव्हरमध्ये 33 रन्स, VIDEO

TNPL 2023 : तुम्ही विचार करत असाल, ईश्वरन आणि अजितेशने एकाच ओव्हरमध्ये 33 रन्स कसे ठोकले?. यात दोन युवा फलंदाजांना मेहनतीबरोबर नशिबाची साथ मिळाली.

TNPL 2023 : क्रिकेटच्या मैदानातले नवीन जय-वीरु, दे दणादण 6,6,6,6,6, एका ओव्हरमध्ये 33 रन्स, VIDEO
TNPL 2023
| Updated on: Jul 11, 2023 | 12:03 PM

चेन्नई : भारतीय क्रिकेटमध्ये बदलत्या काळासोबत ‘जय-वीरु’चा चेहराही बदलत चाललाय. टीम इंडियात ‘जय-वीरु’चा अर्थ ओपनिंग जोडीशी असेल. पण तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये मीडल ऑर्डरमध्ये नवीन ‘जय-वीरु’ची जोडी दिसली. ईश्वरन आणि अजितेश हे ते दोन फलंदाज आहेत. नेल्लई रॉयल किंग्सच्या दोन फलंदाजांनी TNPL 2023 च्या क्वालिफायर 2 सामन्यात एका ओव्हरमध्ये 33 रन्स चोपल्या. यात 5 सिक्स आहेत.

ईश्वरनने ओव्हरच्या पहिल्या 3 चेंडूंवर हल्लाबोल केला. चौथ्या चेंडूवर त्याने स्ट्राइक अजितेशकडे दिली. अजितेशने सुद्धा पुढ्यात आलेल्या चेंडूंचा योग्य समाचार घेतला. या दोन्ही युवा फलंदाजांनी एकाच ओव्हरमध्ये धुमाकूळ घातला. नेल्लई रॉयल किंग्सने ही मॅच 7 विकेटने जिंकली.

शेवटच्या चेंडूवर थरारक विजय

तमिलनाडु प्रीमियर लीग 2023 च्या क्वालिफायर 2 मध्ये नेल्लई रॉयल किंग्ससमोर डिंडीगुल ड्रॅगन्सच आव्हान होतं. सर्वप्रथम डिंडीगुल ड्रॅगन्सने बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 185 धावा केल्या. नेल्लई रॉयल किंग्ससमोर विजयासाठी 186 धावांच टार्गेट होतं. लास्ट बॉलवर सिक्स मारुन नेल्लई टीमने विजयी लक्ष्य गाठलं.

दोन्ही फलंदाजांची कमाल

तुम्ही विचार करत असाल, ईश्वरन आणि अजितेशने एकाच ओव्हरमध्ये 33 रन्स कसे ठोकले?. यात दोन युवा फलंदाजांना मेहनतीबरोबर नशिबाची साथ मिळाली. टीमचा फलंदाज राजागोपालच रिटायर्ड आऊट होणं टीमसाठी रामबाण ठरलं. कारण त्यामुळे ईश्वरनला फलंदाजीची संधी मिळाली. एकाच ओव्हरमध्ये 33 धावा फटकाण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावली.

2 ओव्हर्समध्ये हव्या होत्या 37 धावा

विजयाचा पाठलाग करताना नेल्लई रॉयल किंग्सला शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये विजयासाठी 37 धावांची गरज होती. ईश्वर आणि अजितेशने लास्ट ओव्हरसाठी जास्त धावा ठेवल्या नाहीत. 19 व्या ओव्हरमध्येत त्यांनी हल्लाबोल केला.


अशा वसूल केल्या 33 धावा

19 व्या ओव्हरमध्ये डिंडीगुल ड्रॅगन्सचा जी. किशोर गोलंदाजी करत होता. स्ट्राइकवर असलेल्या ईश्वरनने त्याच्या पहिल्या 3 चेंडूंवर 3 सिक्स मारले. म्हणजे 18 धावा वसूल केल्या. चौथ्या चेंडूवर सिंगल घेऊन स्ट्राइक अजितेशकडे दिला. अजितेशने 5 व्या चेंडूवर सिक्स मारला. पुढचा चेंडू नो बॉल होता. त्यावर 2 धावा वसूल केल्या. नेल्लई रॉयल किंग्सच्या इनिंगच्या 19 व्या ओव्हरमध्ये लास्ट बॉलवर सिक्स मारला. अशा प्रकारे एका ओव्हरमध्ये 33 धावा वसूल केल्या.

लास्ट ओव्हरमध्ये नेल्लई रॉयल किंग्सला विजयासाठी 4 धावांची आवश्यकता होती. त्यांनी हे लक्ष्य आरामात गाठलं. ईश्वरनने 11 चेंडूत नाबाद 39 धावा फटकावल्या. अजितेशने 44 चेंडूत नाबाद 73 धावा केल्या. अजितेशला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला.