Virat Kohli ची रॉजर फेडररसाठी इमोशनल पोस्ट, ‘माझ्यासाठी हा सर्वोत्तम…’

विराटने फेडररसाठी लिहिलेल्या त्या पोस्टमध्ये काय म्हटलय?

Virat Kohli ची रॉजर फेडररसाठी इमोशनल पोस्ट, माझ्यासाठी हा सर्वोत्तम...
roger - nadal
| Updated on: Sep 24, 2022 | 3:35 PM

मुंबई: रॉजर फेडरर आज टेनिसच्या कोर्टवर शेवटचा सामना खेळला. मेन्स सिंगल्सचा हा बेताज बादशाह लेवर कपसाठी कोर्टवर उतरला होता. यावेळी फेडररसोबत त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी राफेल नदालही कोर्टवर उतरला होता. महत्त्वाच म्हणजे यावेळी दोघे परस्पराविरोधात खेळले नाहीत. दोघे एकत्र एका टीममधून खेळले. रॉजर फेडररच्या या शेवटच्या सामन्याचा चाहत्यांसाठी अपेक्षित शेवट झाला नाही. फेडरर-नदाल जोडीला Jack Sock आणि Frances Tiafoe जोडीकडून पराभवाचा सामना करावा लागला.

सर्वांचेच डोळे पाणावले

रॉजर फेडरर करीयरमधील शेवटची मॅच हरला. पण त्याने तमाम टेनिसप्रेमींच मन जिंकलं. टेनिस कोर्टवरच्या या सम्राटाला निरोप देताना सर्वांचेच डोळे पाणावले होते. राफेल सोबत अनेक वर्ष खेळणारे त्याचे स्पर्धक राफेल नदाल, जोकोविच, मरे हे भाविक झाले होते. राफेल नदालच्या डोळ्यातही अश्रू तरळले. रॉजर फेडररने करीयरमध्ये एकूण 20 ग्रँडस्लॅम किताब जिंकले. टेनिस कोर्टवर त्याने अधिराज्य गाजवलं.

रॉजरने अनेकांना जिंकलं होतं

इतकीवर्ष सातत्यपूर्ण खेळून रॉजरने अनेकांना जिंकलं होतं. यात भारतीय क्रिकेटर्सही आहेत. विराट कोहली, जसप्रीत बुमराह देखील रॉजर फेडररचे मोठे चाहते आहेत. रॉजर फेडररने काही दिवसांपूर्वी निवृत्ती जाहीर केली होती. आज तो शेवटचा सामना खेळला. त्यानंतर विराटने त्याच्यासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

विराटने काय लिहिलय?

“कोणी असा विचार केला होता, प्रतिस्पर्ध्यांच्या मनात परस्पराबद्दल अशा भावना असतील. हेच खेळाचं सौंदर्य आहे. माझ्यासाठी क्रीडा क्षेत्रातला सर्वोत्तम फोटो आहे. जेव्हा तुमचा सहकारी तुमच्यासाठी रडतो, त्यावेळी देवाने दिलेल्या टॅलेंटने तुम्ही काय करू शकता हे तुम्हाला ठाऊक असतं. जास्त काही नाही, या दोघांबद्दल मनात प्रचंड आदराची भावना आहे” असं कोहलीने त्याच्या इमोशनल पोस्टमध्ये म्हटलय.