AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शर्मा कर्णधार झाला नाही तर टीम इंडियाचे दुर्दैव, गौतम गंभीरचा व्हिडीओ व्हायरल

भारतीय संघ 19 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया पहिल्यांदा वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेपासून वनडे संघाची धुरा शुबमन गिलच्या खांद्यावर असणार आहे. तर रोहित शर्माला फक्त फलंदाज म्हणून संघात स्थान दिलं आहे.

रोहित शर्मा कर्णधार झाला नाही तर टीम इंडियाचे दुर्दैव, गौतम गंभीरचा व्हिडीओ व्हायरल
रोहित शर्मा कर्णधार झाला नाही तर टीम इंडियाचे दुर्दैव, गौतम गंभीरचा व्हिडीओ व्हायरलImage Credit source: PTI
| Updated on: Oct 06, 2025 | 5:27 PM
Share

वनडे वर्ल्डकप 2027 च्या दृष्टीने आता बीसीसीआयने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. या स्पर्धेच्या दृष्टीने बीसीसीआयने कर्णधारपदाची धुरा शुबमन गिलकडे सोपवली आहे. तर रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून त्याला फक्त फलंदाज म्हणून संघात ठेवलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचे यशस्वी नेतृत्व करून आणि भारतीय संघाला चॅम्पियनशिप मिळवून दिल्यानंतरही रोहित शर्माला अचानक कर्णधारपदावरून काढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे त्याच्या उचलबांगडीसाठी क्रीडाप्रेमी टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीरकडे बोट दाखवत आहेत. गौतम गंभीरचा यात डाव असल्याची टीका अनेकांनी सोशल मीडियावर केली आहे. गौतम गंभीरच्या सूचनेवरून रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे. रोहित शर्माच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर विरोध व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. काहींनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवरही निशाणा साधला.

गौतम गंभीर व्हिडीओत काय म्हणतोय?

गौतम गंभीरचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये टीम इंडियाचे प्रशिक्षक असलेले गौतम गंभीर रोहित शर्माचे कौतुक करताना दिसत आहेत.’जर रोहित शर्मा भारताचा कर्णधार झाला नाही तर ते टीम इंडियाचे दुर्दैव असेल, रोहितचे नाही. जर तो टी20 आणि व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार झाला नाही तर ते लाजिरवाणे असेल.’ इतकंच काय तर गंभीर व्हिडिओमध्ये पुढे म्हणतो की रोहित शर्मा यापेक्षा जास्त काही करू शकत नाही.

विराट कोहली कर्णधार असताना गौतम गंभीरने केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. आता गौतम गंभीर टीम इंडियाचा प्रशिक्षक आहे.असं असताना त्याला कर्णधारपदावरून काढणं अनेकांना रूचलेलं नाही. त्यामुळे अनेक जण गौतम गंभीर यांच्यावर टीका करत आहेत. या व्हिडिओनंतर आता चाहते गौतम गंभीरला खूप ट्रोल करत आहेत. रोहित शर्मा 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत खेळेल आणि संघाचं नेतृत्व करेल अशी अपेक्षा होती. पण आता तसं होणार नाही. उलट त्याचं संघात स्थान राहील की नाही याबाबतही आता शंका उपस्थित केली जात आहे.

फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.