Test Captain : अखेर कसोटी संघाचा कर्णधार ठरला, या खेळाडूकडे नेतृत्वाची धुरा

Test Cricket : क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम मॅनेजमेंटने कसोटी संघासाठी कर्णधार जाहीर केला आहे. जाणून घ्या टीम मॅनेजमेंटकडून कर्णधारपदाची जबाबदारी कुणाला मिळाली आहे.

Test Captain : अखेर कसोटी संघाचा कर्णधार ठरला, या खेळाडूकडे नेतृत्वाची धुरा
Rishabh Pant and Roston Chase Test
Image Credit source: AFP
| Updated on: May 17, 2025 | 4:19 PM

क्रिकेट विश्वात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत. भारत-पाकिस्तान संघर्षामुळे आयपीएलचा 18 वा मोसम एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आला. या दरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी कसोटी क्रिकेटला रामराम केला. तर भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षामुळे मायदेशी परतलेल्या काही विदेशी खेळाडूंनी आता पुन्हा खेळायला येण्यास नकार दिला आहे. दोन्ही देशातील तणाव शांत झाल्यानंतर आता पुन्हा एकदा 17 मे पासून आयपीएलच्या 18 व्या मोसमातील दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. त्याआधी क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे.

रोहित शर्मा याच्या निवृत्तीनंतर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार कोण असणार? याची क्रिकेट चाहत्यांना उत्सूकता लागून आहे. तर दुसऱ्या बाजूला वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने कसोटी संघाचा कर्णधार जाहीर केला आहे. रोस्टन चेस याची कर्णधारपरदी नियुक्ती करण्यात आली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात जून महिन्यापासून कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. चेस या मालिकेतून कर्णधारपदाची सूत्रं हाती घेणार आहे.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम जून महिन्यात विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलिया या दौऱ्यात विंडीज विरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. दोन्ही संघांची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील पहिली मालिका असणार आहे. मालिकेला 25 जून पासून सुरुवात होणार आहे. चेसचा हा कर्णधार म्हणून पहिला तर एकूण 50 वा कसोटी सामना असणार आहे.

क्रेग ब्रेथवेटची आकडेवारी

चेसआधी क्रेग ब्रेथवेट याच्याकडे विंडीजच्या कसोटी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी होती. ब्रेथवेटने मार्च महिन्यात कर्णधारपदाचा राजीनामा दिला. क्रेगने 39 कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व केलं. त्यापैकी विंडीजचा 10 सामन्यांमध्ये विजय झाला. 22 वेळा पराभवाचा सामना करावा लागला. तर 7 सामने अनिर्णित राहिले.

रोस्टन चेस विंडीजचा कसोटी कर्णधार

2 वर्षांपूर्वी शेवटचा सामना

चेसने 2 वर्षांपूर्वी अखेरचा कसोटी सामना खेळला होता. चेसने त्याच्या कारकीर्दीतील 49 वा सामना हा 8 मार्च 2023 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. चेसने 2016 साली टीम इंडिया विरुद्ध पदार्पण केलं होतं. चेसने 49 सामन्यांमध्ये 5 शतकांच्या मदतीने 26.33 च्या सरासरीने 2 हजार 265 धावा केल्या आहेत. तसेच चेसने 85 विकेट्सही घेतल्या आहेत.