AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऋतुराज गायकवाडला लॉटरी लागली, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी थेट टीम इंडियामध्ये निवड

आयपीएल 2026 स्पर्धेचा अंतिम सामना असताना टीम इंडियातून एक घडामोड समोर आली आहे. ऋतुराज गायकवाडची भारत अ संघात निवड झाली आहे. त्यामुळे ऋतुराज गायकवाडचं नशीब चमकलं आहे.

ऋतुराज गायकवाडला लॉटरी लागली, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी थेट टीम इंडियामध्ये निवड
ऋतुराज गायकवाडला लॉटरी लागली, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी थेट टीम इंडियामध्ये निवडImage Credit source: BCCI
| Updated on: May 31, 2026 | 6:03 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत ऋतुराज गायकवाडच्या नेतृ्त्त्वात चेन्नई सुपर किंग्सचा कामगिरी निराशाजनक राहिली. संघाचा प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला. असं असताना त्याच्या कर्णधारपदावर गडांतर येण्याची शक्यता आहे. असं असताना त्याला नशिबाची साथ मिळाली आहे. भारत अ संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात श्रीलंका आणि अफगाणिस्तान संघाविरुद्ध ट्राय सीरिज खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची निवड अधीच झाली होती. पण या संघात ऋतुराज गायकवाड नव्हता. पण त्याला आता संघात एन्ट्री मिळाली आहे. रियान परागच्या जागेवर त्याला संघात स्थान मिळालं आहे. रियान पराग दुखापतग्रस्त असल्याने त्याची जागा ऋतुराजने घेतली आहे.

श्रीलंकेत आयोजित केलेल्या या मालिकेसाठी रियान परागच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची धुरा सोपण्यात आली होती. त्याची जागा आता चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने घेतली आहे. त्याच्याकडे उपकर्णधारपदही सोपवलं आहे. भारत अ संघाचा कर्णधार तिलक वर्माला साथ देताना दिसणार आहे. या संघात वैभव सूर्यवंशी, प्रियांश आर्या, आयु बडोनी, अंशुल कंबोज, प्रभसिमरन सिंग, निशांत दुबे हे खेळाडू आहेत.

बीसीसीआयने आपल्या निवेदनात स्पष्ट केलं की, ‘पुरुष निवड समितीने श्रीलंकेत होणाऱ्या आगामी तिरंगी मालिकेसाठी भारत ‘अ’ संघात ऋतुराज गायकवाडचा समावेश केला आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झालेल्या उपकर्णधार रियान परागची जागा तो घेईल. रियानच्या पुनर्वसनाचे व्यवस्थापन बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) द्वारे केले जाईल.’

भारत अ संघ : तिलक वर्मा (कर्णधार), प्रियांश आर्या, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड़ (उपकर्णधार), आयुष बडोनी, निशांत सिंधु, हर्ष दुबे, सूर्यांश शेडगे, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), कुमार कुशाग्र (विकेटकीपर), विप्रज निगम, यश ठाकुर, युद्धवीर सिंह, अंशुल कंबोज, अरशद खान.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...