
ग्वेबेऱ्हा | दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्यात पावसाने एन्ट्री घेतली. त्यामुळे सामन्यातील पहिला डाव पूर्ण होऊ शकला नाही. टीम इंडियाने 19.3 ओव्हरमध्ये 80 धावा केल्या. त्यानंतर पावसाची सुरुवात झाली.त्यानंतर पावसामुळे जवळपास एक तासाचा खेळ वाया गेला. त्यामुळे टीम इंडियाच्या डावातील 20 ओव्हर पूर्ण होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे आता वेळेत सामना पूर्ण होण्यासाठी 5 ओव्हर कमी करण्यात आल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेला सुधारित आव्हान मिळालं आहे. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी आता 15 ओव्हरमध्ये 152 धावा करायच्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेला 15 ओव्हरमध्ये 152 धावांचं आव्हान हे डीएलएस अर्थात डकवर्थ लुईस नियमानुसार देण्यात आलं आहे. आता 15 ओव्हरचा सामना होणार पावर प्लेमधील 1 ओव्हर कमी करण्यात आली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला पहिल्या 5 ओव्हर या पावर प्लेच्या असणार आहेत. तसेच टीम इंडियाकडून प्रत्येक गोलंदाजाला सर्वाधिक 3 ओव्हर टाकता येतील.
दरम्यान टीम इंडियाने पावसाआधी 19.3 ओव्हरमध्ये 180 धावा केल्या. टीम इंडियाकडून रिंकू सिंह याने नाबाद सर्वाधिक 68 धावांची खेळी केली. तर कॅप्टन सूर्यकुमार यादव याने 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. रवींद्र जडेजा याने 19 धावांचं योगदान दिलं. जितेश शर्मा 1 रन करुन माघारी परतला. ओपनर यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल या दोघांना भोपळाही फोडता आला नाही. वनडाऊन आलेल्या तिलक वर्मा याने 29 रन्स केल्या. तर अर्शदीप सिंह झिरोवर आऊट झाला.
दक्षिण आफ्रिकेला सुधारित आव्हान
Innings Break!
Revised target for South Africa to chase in 15 overs is 152 runs.
Play to resume at 11.10 PM ISThttps://t.co/0sPVek9NdO #SAvIND pic.twitter.com/9KrzFNbWoU
— BCCI (@BCCI) December 12, 2023
तसेच मोहम्मद सिराज झिरोवर नाबाद परतला. दक्षिण आफ्रिकेकडून गेराल्ड कोएत्जी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर लिजाद विलियम्स, मार्को जान्सेन, कॅप्टन एडन मारक्रम आणि तबरेज शम्सी या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडेन मारक्रम (कॅप्टन), मॅथ्यू ब्रीट्जके, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जानसेन, एंडिले फेहलुकवायो, गेराल्ड कोएत्जी, लिजाद विलियम्स आणि तबरेज शम्सी.