SA vs IND 2nd Test Toss | दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला, टीम इंडियात 2 बदल

South Africa vs India 2nd Test Toss | टीम इंडियाने या करो या मरोच्या सामन्यात प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. प्लेईंग ईलेव्हनमध्ये कुणाची एन्ट्री झाली आणि कुणाला बाहेर पडावं लागलं? पाहा दोन्ही संघांची प्लेईंग ईलेव्हन.

SA vs IND 2nd Test Toss | दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला, टीम इंडियात 2 बदल
| Updated on: Jan 03, 2024 | 2:54 PM

केपटाऊन | दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यात आज 3 जानेवारीपासून दुसरा आणि अंतिम कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजता टॉस झाला. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला. आपला अखेरचा कसोटी सामना खेळत असलेल्या कॅप्टन डीन एल्गर याने पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघात बदल

दक्षिण आफ्रिका या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी दुसरा सामना हा करो या मरो असा आहे. टीम इंडियाचा प्रयत्न हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे टीम इंडिया हा सामना जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल करण्यात आले आहेत. शार्दूल ठाकुर दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. त्याच्या जागी मुकेश कुमार याला संधी देण्यात आली आहे. तर आर अश्विन याला बाहेर करुन त्याच्या जागी ऑलराउंडर रवींद्र जडेजा याला संधी देण्यात आली आहे.

तर दुसऱ्या बाजूला यजमान दक्षिण आफ्रिकेने 3 बदल केले आहेत. नियमित कर्णधार टेम्बा बावुमा हा दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. तसेच जेराल्ड कोएत्झी आणि कीगन पीटरसन या दोघांनाही बाहेर बसावं लागलं आहे. तर या तिघांच्या जागी अनुक्रमे ट्रिस्टन स्टब्स, केशव महाराज आणि लुंगी एन्गिडी या तिघांचा समावेश करण्यात आला आहे.

टीम इंडिया 2 बदलासंह दक्षिण आफ्रिके विरुद्ध भिडण्यासाठी सज्ज

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि मुकेश कुमार

दक्षिण आफ्रिका प्लेईंग इलेव्हन | डीन एल्गर (कॅप्टन), एडन मारक्रम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकटेकीपर), मार्को जान्सेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, नांद्रे बर्गर आणि लुंगी एनगिडी.