Diwali Celebration: मास्टर-ब्लास्टरची मुलगी साराचा फेस्टीव्ह लूक पाहिलात का?, काळ्या रंगाच्या ड्रेसमधील हे PHOTO पाहाच!

सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हटलं जातं. जगभरात आपल्या खेळामुळे प्रसिद्ध असलेल्या सचिनची मुलगी सारा सध्या सोशल मीडिया सेन्सेशन बनत आहे. तिचे सुंदर फोटो नेटकऱ्यांचं मन जिंकत आहेत.

| Edited By: | Updated on: Nov 05, 2021 | 8:30 PM
1 / 4
महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला जगभरात ओळख आहे. आता त्याची मुलही आपली ओळख बनवू लागली आहेत. मुलगा अर्जुनला नुकतंच मुंबई इंडियन्सने विकत घेतलं असून तो वडिलांप्रमाणेच क्रिकेटपटू आहे. तर मुलगी सारा तेंडुलकर ही देखील सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध आहे. ती कायम आपले नवनवीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन लाईक्स लुटत असते.

2 / 4
साराने नुकतेच काही दिवाळी साजरी करतानाचे फोटो पोस्ट केले. यामध्ये तिने एक पारंपरिक काळ्या रंगाचा ड्रेस घातला असून गाडीत बसलेले तसेच घरातील काही फोटो पोस्ट केले आहेत.

3 / 4
साराने पोस्ट केलेल्या फोटोजमध्ये तिचे एकटीचे काही फोटो आहेत. तर एका फोटोंमध्ये तिची मित्रमंडळीही दिसून येत आहेत.

4 / 4
सारा कायमच तिचे विविध फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. ती शिक्षणासाठी लंडनमध्ये असल्याने अनेकदा तिचे फोटो हे मुंबई आणि लंडन या ठिकाणचेच असतात. तिने तिच्या इन्स्टा कॅप्शनमध्ये मुंबई आणि लंडन अशा दोन्ही शहराचं नाव लिहिलं आहे. साराही सर्वाधिक सक्रिय इन्स्टाग्रामवर असून तिचे अनेक चाहते आहेत. साराच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचा विचार करता 1.3 मिलीयन इतके फॉलोवर्स आहेत.