AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : संजू, अक्षर की बुमराह? तिघांपैकी भारताच्या विजयाचा खरा हिरो कोण?

India vs England Semi Final: संजू सॅमसन याने केलेल्या 89 धावांच्या खेळीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं. मात्र इतर खेळाडूंनीही भारताच्या विजयात प्रमुख योगदान दिलं.

IND vs ENG : संजू, अक्षर की बुमराह? तिघांपैकी भारताच्या विजयाचा खरा हिरो कोण?
Sanju Samson Axar Patel And Jasprit Bumrah Team IndiaImage Credit source: Bcci X Account and Social Media
| Updated on: Mar 06, 2026 | 8:18 AM
Share

भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी 5 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील सामन्यात इंग्लंडवर मात केली. भारताने या विजयासह चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक दिली. भारताने इंग्लंडसमोर या सामन्यात 254 धावांचं आव्हान ठेवलं होतं. इंग्लंडनेही शेवटच्या बॉलपर्यंत प्रयत्न केले. मात्र त्यांचे प्रयत्न 7 धावांनी कमी पडले. इंग्लंडने 20 ओव्हरमध्ये जेकब बेथल याच्या शतकी खेळीच्या जोरावर 7 विकेट्स गमावून 246 धावा केल्या.

टीम इंडियाच्या विजयाचे 3 हिरो

टीम इंडियाला विजयी करण्यात ओपनर आणि विकेटकीपर संजू समॅसन, ऑलराउंडर अक्षर पटेल आणि वेगवान गोलंदाज यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहला या तिघांनी प्रमुख योगदान दिलं. या तिघांनी केलेल्या कामगिरीबाबत आपण जाणून घेऊयात.

संजू सॅमसन

संजू सॅमसन याने टीम इंडियाला स्फोटक सुरुवात करुन देण्यात प्रमुख भूमिका बजावली. संजूने या सामन्यात 42 बॉलमध्ये 211.90 च्या स्ट्राईक रेटने 89 रन्स केल्या. संजूने या खेळीत 7 सिक्स आणि 8 फोर लगावले. तसेच संजूने निर्णायक क्षणी विकेटकीपिंग करताना स्ट्राईक एन्डवर सेट जेकब बेथल याला 105 धावांवर रन आऊट केलं.

अक्षरचं बॉलिंग-फिल्डिंगने अप्रतिम योगदान

अक्षर पटेल याला शेवटच्या क्षणी संधी मिळाल्याने त्याला बॅटिंगने काही योगदान देता आलं नाही. अक्षरने नाबाद 2 धावा केल्या. मात्र त्याने फिल्डिंगदरम्यान ही उणीव भरुन काढली. अक्षरने टॉम बँटन याला 17 रन्सवर बोल्ड केलं आणि एकमेव विकेट मिळवली. तसेच अक्षरने इंग्लंडचा कॅप्टन हॅरी ब्रूक याची उलट दिशेने धावत जात अप्रतिम अशी कॅच घेतली. तसेच अक्षरने फिलिप सॉल्ट याचाही कॅच घेतला. तसेच अक्षरने सीमारेषेवर शिवम दुबे याच्या मदतीने कॅच पूर्ण केला. अक्षरने समसुचकता दाखवून कॅच घेतला. मात्र तोल जाताच त्याने शिवमच्या दिशने बॉल फेकला. शिवमनेही चूक न करता कॅच पूर्ण केला. अक्षर आणि शिवमच्या या हुशारीमुळे विल जॅक्सनच्या खेळीचा निर्णायक क्षणी शेवट झाला. विलने 20 बॉलमध्ये 35 रन्स केल्या.

जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराह म्हणजे भारताचं प्रमुख आणि धारदार शस्त्र. बुमराहने या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 8.20 च्या स्ट्राईक रेटने एकूण 33 धावा देत एकमेव विकेट मिळवली. मात्र बुमराहने त्याच्या कोट्यातील शेवटच्या 2 ओव्हर अत्यंत चिवट पद्धतीने टाकल्या. त्यामुळे इंग्लंडला बॅकफुटवर टाकता आलं. बुमराहने इंग्लंडच्या डावातील 16 व्या ओव्हरमध्ये 8 तर 18 व्या षटकात 6 धावा दिल्या. त्यामुळे टीम इंडियाकडे शेवटच्या 2 षटकांत बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त धावा राहिल्या.

Follow Us
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत शिंदेंचा नेता स्पष्टच म्हणाला
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी...काय बदलणार?
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा...
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
Sharad Pawar | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची पंतप्रधान मोदींना थेट विनंती
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं मोठं विधान
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद, व्हिडीओ आले समोर
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन; व्हिडिओ व्हायरल