AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SAW vs INDW : अनुष्का शर्माची टीम इंडियात एन्ट्री, 2 खेळाडूंचा पत्ता कट, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॅटिंग

South Africa Women vs India Women 2nd T20i and Playing 11 : हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात वुमन्स टीम इंडियाची दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात पराभवाने झाली. त्यानंतर महिला ब्रिगेडमधून 2 खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. जाणून घ्या.

SAW vs INDW : अनुष्का शर्माची टीम इंडियात एन्ट्री, 2 खेळाडूंचा पत्ता कट, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॅटिंग
Women Team IndiaImage Credit source: Bcci
| Updated on: Apr 19, 2026 | 6:17 PM
Share

वुमन्स टीम इंडिया हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिका दौऱ्याची (India Women Tour Of South Africa 2026) सुरुवात विजयाने करण्यात अपयशी ठरली. यजमान दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील सलामीच्या सामन्यात शनिवारी 17 एप्रिलला दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर 6 विकेट्सने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने 158 धावांचं आव्हान हे 5 बॉलआधी 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. त्यामुळे आता टीम इंडियाच्या महिला ब्रिगेडसमोर दक्षिण आफ्रिकेला सलग दुसरा सामना जिंकण्यापासून रोखण्याचं आव्हान असणार आहे.

उभयसंघातील दुसरा सामनाही किंग्समीडमधील डरबनमध्ये खेळवण्यात येत आहे. सामन्याला 19 एप्रिलला संध्याकाळी साडे 5 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 5 वाजता टॉस झाला. दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन लॉरा वॉल्वार्ड हीने बॉलिंगचा निर्णय घेत भारताला बॅटिंगसाठी बोलावलंय. त्यामुळे भारताची सलामी जोडी महिला ब्रिगेडसाठी कशी सुरुवात करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टीम इंडियातून दोघींचा पत्ता कट

पहिल्या पराभवानंतर टीम इंडियाने प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. अनुष्का शर्मा हीचं टी 20I क्रिकेटमध्ये पदार्पण झालं आहे. तर क्रांती गौड हीला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या 2 बदलांमुळे टीम इंडिया विजयाचं खातं उघडणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेने पहिल्याच सामन्यातील प्लेइंग ईलेव्हनसह खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

अनुष्का शर्माची टीम इंडियात एन्ट्री

अनुष्का शर्मा हीला कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने टीम इंडियाची कॅप दिली. हरमनप्रीतने यासह अनुष्काचं स्वागत केलं तसेच शुभेच्छाही दिल्या. अनुष्का या मालिकेतून पदार्पण करणारी दुसरी भारतीय खेळाडू ठरली. अनुष्काआधी काश्वी गौतम हीने टी 20i पदार्पण केलं होतं.

वुमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कॅप्टन), ऋचा घोष (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, अनुष्का शर्मा, श्रेयंका पाटील, दीप्ती शर्मा, श्री चरणी आणि क्रांती गौड.

दक्षिण आफ्रिका वुमन्स प्लेइंग ईलेव्हन : लॉरा वॉल्वार्ड (कर्णधार), सुने लुस, तझमिन ब्रिट्स, ॲनेरी डेर्कसेन, ॲनेके बॉश, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), अयाबोंगा खाका, तुमी सेखुखुने आणि नॉनकुलुलेको मलाबा.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...