AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SA vs IND : टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी 20I सामन्यात बॅटिंग, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?

South Africa Women vs India Women, 1st T20I Toss : यजमान दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून पाहुण्या टीम इंडियाला बॅटिंगची संधी दिली आहे. टीम इंडियाची महिला ब्रिगेड या सामन्यात किती धावांपर्यंत मजल मारते याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

SA vs IND : टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी 20I सामन्यात बॅटिंग, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?
South Africa Women vs India Women 1st T20i TossImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Apr 17, 2026 | 10:01 PM
Share

वुमन्स टीम इंडिया हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Womens Tour Of South Africa 2026) आहे. टीम इंडिया या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज 17 एप्रलिला डरबनमधील किंग्समीडमध्ये आयोजित करण्यात आला आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 9 वाजता टॉस झाला. दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने टॉसचा कॉल लागला. दक्षिण आफ्रिकेची कॅप्टन लॉरा वोल्वार्ड्ट हीने फिल्डिंगचा निर्णय घेत टीम इंडियाला बॅटिंगसाठी बोलावलं आहे.

काश्वी गौतमचं टी 20i पदार्पण

या मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. त्यापैकी क्रांती गौड, अनुष्का शर्मा, उमा चेत्री आणि भारती फुलमाळी या चौघींना प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आलेली नाही. तर एकीचं टी 20i पदार्पण झालं आहे. टीम मॅनेजमेंटने काश्वी गौतम हीला पदार्पणाची संधी दिली आहे. काश्वीला सामन्याआधी भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने कॅप देऊन स्वागत केलं आणि शुभेच्छा दिल्या.

काश्वी गौतम बॉलिंग ऑलराउंडर आहे. काश्वी याआधी टीम इंडियासाठी कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळली आहे. काश्वीने टीम इंडियाचं 1 कसोटी आणि 6 एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळे काश्वी टी 20i पदार्पणात कशी कामगिरी करते याकडे टीम मॅनेजमेंटचं लक्ष असणार आहे.

सलामी जोडीकडून भक्कम सुरुवातीची आशा

दरम्यान दक्षिण आफ्रिकेने बॅटिंगसाठी भाग पाडलं असल्याने टीम इंडियाच्या सलामी जोडीसमोर चांगली सुरुवात मिळून देण्याचं आव्हान असणार आहे. उपकर्णधार स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा या दोघी ओपनिंग करतात. या दोघींकडून चाहत्यांना वादळी सुरुवातीची आशा असणार आहे.

डरबमनमध्ये टीम इंडियाच्या महिला ब्रिगेडची बॅटिंग

वुमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कॅप्टन), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, काशवी गौतम, श्रेयांका पाटील, रेणुका सिंग ठाकूर आणि श्री चरणी.

दक्षिण आफ्रिका वुमन्स प्लेइंग ईलेव्हन : तझमिन ब्रिट्स, सुने लुस, लॉरा वोल्वार्ड (कॅप्टन), ॲनेरी डेर्कसेन, ॲनेके बॉश, क्लो ट्रायॉन, नादीन डी क्लर्क, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), अयाबोंगा खाका, तुमी सेखुखुने आणि नॉनकुलुलेको मलाबा.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...