
मेलबर्न: टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) प्रत्येकाला भारत-पाकिस्तान सामन्याची प्रतिक्षा आहे. 23 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये हा सामना खेळला जाणार आहे. पण या मॅचआधी पाकिस्तानी टीमला मोठा झटका बसला आहे. पाकिस्तानी फलंदाज शान मसूदच्या (Shan Masood) डोक्याला मार लागला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या प्रकृतीबद्दल पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने (PCB) अजून अपडेट दिलेलं नाही. पण पाकिस्तानचा उपकर्णधार शादाब खानने त्याला प्रार्थनांची गरज आहे, असं म्हटलं आहे.
वेदनेने तो तडफडत होता
मेलबर्नमध्ये शुक्रवारी 21 ऑक्टोबरला पाकिस्तानी टीम सराव करत होती. त्यावेळी पाकिस्तान टीमचा ऑलराऊंडर मोहम्मद नवाजने एक फटका मारला. हा शॉट थेट शान मसूदच्या डोक्याला जाऊन लागला. डोक्याला बॉल लागल्यानंतर मसूद तिथेच खाली पडला. वेदनेने तो तडफडत होता. अन्य खेळाडूंनी लगेच त्याच्याजवळ धाव घेतली.
मसूदसाठी प्रार्थना करा
मसूदला लगेच मेलबर्नच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. टीमचा स्टार लेग स्पिनर शादाब खानने पत्रकारांशी चर्चा केली. “मसूदच्या प्राथमिक टेस्टचे रिपोर्ट चांगले आहेत. आता डॉक्टरच्या उत्तराची प्रतिक्षा आहे. चेंडूला त्याचा चुकीच्या जागी लागलाय. आमच्या फिजियोने त्याच्या सुरुवातीच्या टेस्ट केल्या. त्यात तो ओके आहे. आता तो रुग्णालयात आहे. तिथे स्कॅनिंग सुरु आहे. तुम्हाला विनंती आहे, तुम्ही सगळ्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना करा. आम्ही सुद्धा प्रार्थना करतोय” असं शादाब खान म्हणाला.
Shadab about shan masood injury pic.twitter.com/VwpC0KySKu
— Shizza~♪ (@shizzapizzaa) October 21, 2022
मागच्या महिन्यात केला डेब्यु
डावखुरा फलंदाज शान मसूदने मागच्या महिन्यात पाकिस्तानसाठी टी 20 क्रिकेटमध्ये डेब्यु केला. त्याचा वर्ल्ड कप टीममध्ये समावेश करण्यात आला. पाकिस्तानी टीममध्ये त्याला तिसऱ्या नंबरवर बॅटिंगसाठी उतरवण्यात येत होतं. त्याला कामगिरीत सातत्य ठेवता आलेल नाहीय. पण वर्ल्ड कपमध्ये त्याच्याकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा आहे.