‘द वॉल’ने ठरवली श्रीलंका दौऱ्याची रणनीती, द्रविड म्हणतो तीनच T20 सामने, सगळ्यांनाच कशी संधी मिळेल?

| Updated on: Jun 28, 2021 | 1:58 PM

श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात जास्तीत जास्त युवा खेळाडूंना संधी देण्यात आली. दिग्गज खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर असले तरी भारताकडे नव्या दमाचे युवा खेळाडू आहेत. मात्र यातील नेमक्या कितीजणांना संधी मिळणार हे पहावे लागेल.

द वॉलने ठरवली श्रीलंका दौऱ्याची रणनीती, द्रविड म्हणतो तीनच T20 सामने, सगळ्यांनाच कशी संधी मिळेल?
shikhar dravid
Follow us on

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (WTC Final) न्यूझीलंड संघाकडून पराभूत झाला आणि जगज्जेता होण्यापासून थोडक्यात राहिला. या पराभवानंतर आता पुन्हा विजयी घौडदौड सुरु कण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. त्यासाठी आता भारताचे युवा खेळाडू असलेली तरुण तडफदार भारतीय टीम श्रीलंका दौऱ्यासाठी लवकरच रवाना होणार आहेत. श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारताचा दिग्गज खेळाडू शिखर धवन (Shikhar Dhawan) याला कर्णधारपदाची तर भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. तसेच माजी खेळाडू राहुल द्राविडला (Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षक पदाचा भार सोपवण्यात आला आहे. दरम्यान 27 जून रोजी शिखर धवन आणि राहुल द्रविड यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेत श्रीलंका दौऱ्याच्या रणनीतीबाबत माहितती दिली.

यावेळी द्रविडने हे स्पष्ट केले की, श्रीलंका दौऱ्यात केवळ तीन वनडे आणि तीन टी-20 सामने असल्याने दौऱ्यावर नेलेल्या सर्व खेळाडूंना संधी मिळणे कठीण आहे. द्रविड म्हणाला, ”या दौऱ्यावर सर्वच खेळाडूंना संधी मिळणे कठीण आहे. कारण केवळ तीन टी-20 आणि तीन वनडे सामनेच या दौऱ्यात आहेत. बीसीसीआयचे दोन निवडकर्ते देखील दौऱ्यावर असल्याने टी-20 विश्वचषकात संधी मिळवण्यासाठी चांगल्या खेळाचे प्रदर्शन सर्व खेळाडू करताना दिसतील.”

‘या’ त्रिकुटामध्ये चुरशीची टक्कर

श्रीलंका दौऱ्यात अनेक नव्या खेळाडूंना संधी देण्य़ात आली आहे. तसेच टी-20 विश्वचषक जवळ आला असल्याने कोणत्या नव्या खेळाडूंना विश्वचषकात संधी द्यायची हे ठरवण्यासाठी बीसीसीआयचे निवडकर्ते भारताचे माजी क्रिकेटपटू देबाशीष मोहंती आणि अबे कुरवीला हे दोघेही संघासोबत दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी भारताचे तीन युवा फलंदाज इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांच्यात काटेंकी टक्कर असले. कारण तिघांनी आयपीएलमध्ये स्वत:चा अप्रतिम खेळ दाखवल्याने विश्वचषकासाठी कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरले.

भारताचा श्रीलंका दौरा

टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. यात पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै, दुसरा 16 जुलै आणि तिसरा 18 जुलैला खेळवला जाणार आहे. तर पहिला टी-20 सामना 21 जुलै, दुसरा 23 जुलै आणि तिसरा 25 जुलैला खेळवला जाईल.

भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीष राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन साकरिया.

हे ही वाचा :

IND vs SL : धवन सेना श्रीलंका दौऱ्यासाठी सज्ज, लवकरच रवाना होणार, बीसीसीआयने शेअर केला दमदार फोटो

WTC Final मध्ये पराभवानंतर श्रीलंका दौरा जिंकण्यासाठी युवा क्रिकेटपटू करतायत मेहनत, बीसीसीआयने शेअर केले फोटो

Video : भन्नाट मराठी गाण्यावर सूर्यकुमार यादवचा वर्कआऊट, व्हिडीओ पाहून चाहते खुश

(Shikhar Dhawan And Rahul Dravid says its hard to give opportunity to all Youngsters in Sri Lanka Tour)