IND vs SL : धवन सेना श्रीलंका दौऱ्यासाठी सज्ज, लवकरच रवाना होणार, बीसीसीआयने शेअर केला दमदार फोटो

भारताचे वरीष्ठ क्रिकेटपटू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पराभूत झाले. या पराभवानंतर आता युवा भारतीय क्रिकेटपटू असणारी भारतीय टीम श्रीलंका दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे.

IND vs SL : धवन सेना श्रीलंका दौऱ्यासाठी सज्ज, लवकरच रवाना होणार, बीसीसीआयने शेअर केला दमदार फोटो
Team India
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 11:42 AM

मुंबई : श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची (India tour of Sri Lanka) घोषणा करण्यात आली आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारताचा दिग्गज खेळाडू शिखर धवन (Shikhar Dhawan) याला कर्णधारपदाची तर भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. तसेच माजी खेळाडू राहुल द्राविडला (Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षक पदाचा भार सोपवण्यात आला आहे. सोबतच ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), चेतन सकारीया (Chetan sakariya), देवदत्त पडीक्कल (Devdutt padikkal) अशा बऱ्याच नव्या दमाच्या भारतीय खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. त्यामुळे हा दौरा अत्यंत उत्कंटावर्धक असणार अशी आशा क्रिकेटप्रेमी व्यक्त करत आहेत. (BCCI Shares A Photo of the Team touring Sri Lanka)

खेळाडूंसह बीसीसीआयने 18 सदस्यीय सपोर्ट स्टाफची नावंही जाहिर केली आहेत. तसेच यंदा दोन निवडकर्ते देखील संघासोबत या दौऱ्यावर जाणार आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू देबाशीष मोहंती आणि अबे कुरवीला अशी या दोघांची नावे असून ते देखील संघासोबत दौऱ्यावर जाणार आहेत. त सपोर्ट स्टाफमध्ये राहुल द्रविड (मुख्य प्रशिक्षक), सुधीर असनानी (मॅनेजर), पारस म्हांब्रे (गोलंदाजी प्रशिक्षक), टी दिलीप (फील्डिंग प्रशिक्षक), आशीष कौशिक (फिजियो), निरंजन पंडित (फिजियो), आनंद दाते (ट्रेनर), अल हर्षा (ट्रेनर), अशोक साध (थ्रोडाउन विशेषज्ञ), सौरव अंबाडकर (थ्रोडाउन विशेषज्ञ), सुमित मलापुर्कर (लॉजिस्टिक मॅनेजर), आनंद सुब्रामण्यम (मीडिया मॅनेजर), अमेया तिलक (कंटेंट प्रोड्यूसर), अभिजीत साल्वी (टीम डॉक्टर), रविंद्र ढोलपुरे (सिक्यॉरिटी ऑफिसर), नंदन माझी (मसाज), मंगेश गायकवाड़ (मसाज), एल वरुण (अॅनलिस्ट) यांची नावे आहेत. या सर्व भारतीय क्रिकेट संघाचा एक धांसू फोटो बीसीसीआयने शेअर केला आहे.

भारताचा श्रीलंका दौरा

टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. यात पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै, दुसरा 16 जुलै आणि तिसरा 18 जुलैला खेळवला जाणार आहे. तर पहिला टी-20 सामना 21 जुलै, दुसरा 23 जुलै आणि तिसरा 25 जुलैला खेळवला जाईल.

भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीष राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन साकरिया.

हे ही वाचा :

WTC Final मध्ये पराभवानंतर श्रीलंका दौरा जिंकण्यासाठी युवा क्रिकेटपटू करतायत मेहनत, बीसीसीआयने शेअर केले फोटो

Video : भन्नाट मराठी गाण्यावर सूर्यकुमार यादवचा वर्कआऊट, व्हिडीओ पाहून चाहते खुश

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.