असशील मोठा क्रिकेटर, पण घरी नाही! आईसमोर श्रेयस अय्यर क्लिन बोल्ड, पाहा Video

श्रेयस अय्यरची गणना दिग्गज खेळाडूंमध्ये होते. त्याच्यातील नेतृत्व गुणही आयपीएल स्पर्धेत अधोरेखित झाले आहे. असं असताना श्रेयस अय्यरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात आईने टाकलेल्या गोलंदाजीवर क्लिन बोल्ड झाल्याचं दिसत आहे.

असशील मोठा क्रिकेटर, पण घरी नाही! आईसमोर श्रेयस अय्यर क्लिन बोल्ड, पाहा Video
Video : श्रेयस अय्यर आईच्या गोलंदाजीवर क्लिन बोल्ड, चेंडू खेळताना अशा पद्धतीने फसला
Image Credit source: video grab
| Updated on: Jul 01, 2025 | 4:37 PM

श्रेयस अय्यर आयपीएल असो की आंतरराष्ट्रीय क्रिकेट, भल्याभल्या गोलंदाजांना पुरून उरला आहे. आयपीएल 2025 स्पर्धेत त्याच्या नेतृत्वात पंजाब किंग्सने अंतिम फेरी गाठली होती. पण दुर्दैवाने जेतेपदाची चव चाखता आली नाही. पण श्रेयस अय्यरच्या नेतृत्व गुण आणि फलंदाजीची प्रशंसा झाली. श्रेयस अय्यरची निवड इंग्लंड दौऱ्यासाठी झाली नाही. त्यामुळे सध्या घरीच असून क्रिकेटचा आनंद लुटत आहे. या दरम्यानं त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात श्रेयस त्याच्या आईसोबत घरात क्रिकेट खेळताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओत श्रेयसची आई गोलंदाजी करत आहेत. तर तो स्वत: तिच्या गोलंदाजीचा सामना करत आहे. आईने त्याला दोन चेंडू टाकले. यात पहिला चेंडू श्रेयस अय्यर सराईतपण खेळतो. पण दुसऱ्या चेंडूवर फटका मारताना फसतो आणि क्लिन बोल्ड होतो. त्याला बाद केल्याचा आनंद त्याच्या आईच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसला. इतकंच काय तर त्यांनी आनंदाने उड्याही मारल्या. हा व्हिडीओ पंजाबी किंग्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पंजाब किंग्सने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना लिहिलं की, सरपंचला या वेळेस क्लिन बोल्ड होताना जास्त वाईट वाटलं नसेल. यावर एका चाहत्याने नवजोत सिंग सिद्धूच्या अंदाजात मजेशीर कमेंट्स केली. त्याने लिहिलं की, गुरू… गुरु, बॉल ने पड़ के जो कांटा बदला है उसका कोई जवाब नहीं…खटॅक.. तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं की, कदाचित त्याच्या आईला त्याची कमकुवत बाजू माहिती आहे.

श्रेयस अय्यरचा फॉर्म जबरदस्त असल्याचं दिसून आलं आहे. मागच्या तीन महिन्यात त्याने तीन अंतिम सामने खेळले. यात त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली. यात त्याने एकूण 243 धावा केल्या. अंतिम फेरीचा सामना 9 मार्चला खेळला गेला. यात त्याने भारताने न्यूझीलंडला 4 विकेटने पराभूत केलं. तर 3 जूनला पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आले होते. यात पंजाब किंग्सला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यानंतर मुंबई टी20 लीग स्पर्धेत त्याच्या नेतृत्वाखालील मुंबई फॅल्कन्स संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती. पण मराठा रॉयल्सने 5 विकेट्स राखून पराभूत केलं.