ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारतीय संघाची घोषणा

आशिया कप स्पर्धेचं बिगुल वाजलं असताना दुसरीकडे भारत ए संघ ऑस्ट्रेलिया ए विरूद्धच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारतीय संघाची घोषणा
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारतीय संघाची घोषणा
Image Credit source: PTI
| Updated on: Sep 06, 2025 | 3:30 PM

आशिया कप 2025 स्पर्धेचे वेध लागले असताना ऑस्ट्रेलिया ए संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यामुळे भारतीय ए संघदेखील जोरदार तयारी करत आहे. ऑस्ट्रेलिया ए संघाविरूद्धची मालिका ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वीची रंगीत तालिम म्हणून गणली जात आहे. असं असताना बीसीसीआयने टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यरवर मोठी जबाबदारी टाकली आहे. त्याच्या भारत ए संघाची जबाबादारी सोपवली आहे. ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध 16 सप्टेंबरपासून दोन चार दिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. पहिला सामना 16 सप्टेंबर, तर दुसरा सामना 26 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. हे दोन्ही सामने लखनौला होणार आहेत. श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद सोपवल्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी त्याच्या नावाचा विचार होईल असं वाटत आहे. कारण आशिया कप स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. दरम्यान,  भारतीय अ संघात अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यष्टीरक्षक ध्रुव जुरेल हा उपकर्णधार आणि विकेटकीपर म्हणून भूमिका बजावणार आहे.

दुसरीकडे, या संघातून दुलीप ट्रॉफीत जबरदस्त कामगिरी केलेल्या ऋतुराज गायकवाडला डावललं आहे. त्यामुळे त्याला आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, एन जगदीसनला या संगात स्थान मिळालं आहे. दुसऱ्या सामन्यासाठी केएल राहुल आणि मोहम्मद सिराज यांना संघात समाविष्ट केले जाईल. पहिल्या सामन्यानंतर संघातील दोन खेळाडूंची जागा घेतील. पण हे दोन खेळाडू कोण असतील हे मात्र अस्पष्ट आहे.

भारतीय अ संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, एन जगदीसन (विकेटकीपर), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (उपकर्णधार/विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, हर्ष दुबे, आयुष बडोनी, नितीश कुमार रेड्डी, तनुष कोटियन, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, खलील अहमद, मानव सुतार, यश ठाकुर.

दरम्यान, वनडे मालिकेसाठी होणाऱ्या संघाकडे  साऱ्या क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. कारण या मालिकेत रोहित शर्माने खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या मालिकेत रोहित शर्माची निवड झाली तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी दावा पक्का होणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली वनडे फॉर्मेटमध्ये खेळत आहे. तसेच रोहित शर्माकडेच कर्णधारपद असून त्यात काही बदल केलेला नाही. भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ संघ 30 सप्टेंबर, 3 ऑक्टोबर आणि 5 ऑक्टोबर रोजी कानपूरमध्ये तीन एकदिवसीय सामने खेळतील.