
काही खेळाडू शांत स्वभावाचे असतात. पण काहीवेळा कॅप्टनशिपच्या जबाबदारीमुळे खेळाडूंच्या या मूळ स्वभावात बदल होतो. भारतीय फलंदाज शुभमन गिलच्या बाबतीत सुद्धा सध्या असच काहीस दिसून येतय. शुभमन गिलला IPL 2024 मध्ये पहिल्यांदा कॅप्टनशिप भूषवण्याची संधी मिळाली आहे. हार्दिक पांड्याने गेल्यानंतर गुजरात टायटन्सने शुभमन गिलला कॅप्टन बनवलं. कॅप्टन म्हणून गिलच प्रदर्शन तस समाधानकारक आहे. पण मैदानावर त्याचा स्वभाव मात्र बदलेला दिसतोय. शुभमन नेहमीपेक्षा थोडा आक्रमक दिसतोय. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात हेच दिसून आलं. शुभमन गिलने मैदानातच अंपायरशी हुज्जत घातली.
लखनऊच्या एकाना स्टेडियमवर गुजरात टायटन्सचा सामना यजमान LSG विरुद्ध होता. या मॅचमध्ये गुजरात टायटन्सची टीम पहिल्यांदाज गोलंदाजीसाठी उतरलेली. मॅच सुरु झाल्यानंतर पहिल्या 5 चेंडूतच तमाशा झाला. एक निर्णय त्याला कारणीभूत ठरला. गुजरात टायटन्ससाठी उमेश यादव पहिली ओव्हर टाकत होता. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर क्विंटन डिकॉकला आऊट केलं. लखनऊचा तो पहिला विकेट होता.
पहिल्या ओव्हरमध्ये वाद
त्यानंतर क्रीजवर देवदत्त पडिक्कल. उमेशच्या पुढच्याच चेंडूवर पडिक्कल विरुद्ध जोरदार LBW अपील झालं. अंपायरने नॉट आऊट दिलं. गुजरातच्या खेळाडूंना आपल्या अपीलवर खूप विश्वास होता. कॅप्टन शुभमन गिलने लगेच DRS घेतला. या सीजनमध्ये BCCI ने आयपीएलमध्ये सुपर रिप्लेचा वापर केला. थर्ड अंपायरने लगेच रिप्ले पाहतो व निर्णय देतो. इथे सुद्धा असच झालं. थंर्ड अंपायरने जराही वेळ न दवडता लगेच जाहीर केलं, अंपायरचा निर्णय योग्य आहे. पडिक्कल नॉट आऊट आहे.
अल्ट्राएज शिवाय निर्णय कसा?
शुभमन गिल या निर्णयावर नाराज झाला. थेट जाऊन अंपायरशी बोलला. यावेळी गिल आक्रमक वाटत होता. आता गिलने अंपायरशी जाऊन हुज्जत का घातली?. त्याच असं आहे की, अंपायरने जो रिप्ले पाहून निर्णय दिलेला, त्यात त्याने फक्त नॉर्मल रिप्ले पाहिला होता. यात अल्ट्राएज रिप्ले नव्हता. या रिप्लेमध्ये चेंडू बॅट लागला आहे की, नाही? ते कळतं. तो रिप्ले ग्राऊंडवरील मोठ्या स्क्रीनवर दिसला नाही. त्यामुळे गिल रागावला. त्याने अंपायरला विचारलं की, अल्ट्राएज शिवाय निर्णय कसा झाला?
अल्ट्राएजमध्ये काय दिसलं?
गुजरातच्या अन्य खेळाडूंनी सुद्धा अंपायरला घेरलं. अंपायर थर्ड अंपायरशी बोलला. अल्ट्राएजवर चेंडू आधी बॅटला नंतर पॅडला लागल्याच दिसलं. म्हणून पडिक्कलला नॉट आऊट दिलं. गुजरातला यामुळे फार नुकसान झालं नाही. कारण तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करणाऱ्या उमेश यादवने पडिक्कलची विकेट काढली.