SL vs NZ : कामिंदु मेंडीसचा धमाका, सिक्ससह 1 हजार धावा, 74 वर्षांनंतर असं घडलं

Kamindu Mendis SL vs NZ 2nd Test : कामिंदु मेंडीस याने न्यूझीलंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 182 धावांची नाबाद खेळी केली. कामिंदुने या खेळीदरम्यान अनेक रेकॉर्ड उद्धवस्त केले आहेत.

SL vs NZ : कामिंदु मेंडीसचा धमाका, सिक्ससह 1 हजार धावा, 74 वर्षांनंतर असं घडलं
kamindu mendis 1 thousand test runs
Image Credit source: sri lanka cricket x account
| Updated on: Sep 27, 2024 | 7:07 PM

श्रीलंकेचा 25 वर्षीय युवा फलंदाज कामिंदु मेंडीस कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने धमाकेदार कामगिरी करतोय. कामिंदुने जुलै 2022 मध्ये कसोटी पदार्पण केलं होतं. कामिंदुने तेव्हापासून ते आतापर्यंत एकूण 13 डावांमध्ये 1 हजार 4 धावा केल्या आहेत. कामिंदुने मायदेशात न्यूझीलंड विरूद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटीतील पहिल्या डावात 182 धावांची नाबाद विस्फोटक खेळी केली. कामिंदुने यासह कसोटी क्रिकेटमध्ये 1 हजार धावांचा टप्पा पार केला. कामिंदुने ज्या पद्धतीने 1 हजार धावा पूर्ण केल्या ते कायम लक्षात ठेवलं जाईल. कामिंदु कसोटीत डावांनुसार वेगवान 1 हजार धावा करणारा संयुक्तरित्या दुसरा फलंदाज ठरला आहे. कामिंदुने दिग्गज सर डॉन ब्रॅडमॅन यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. तर इंग्लंडच्या हरबर्ट सटक्लिफ आणि विंडिजच्या एवर्टन वीक्स या दोघांनी 12-12 डावात 1 हजार धावा केल्या आहेत.

कामिंदुने रचीन रवींद्र याच्या बॉलिंगवर सिक्स ठोकत 1 हजार धावांचा पल्ला गाठला. कामिंदु तेव्हा 182 धावांवर खेळत होता. कामिंदुच्या 1 हजार धावा पूर्ण होताच कॅप्टन धनंजया डी सिल्वा याने श्रीलंकेचा पहिला डाव हा 602 धावांवर घोषित केला. मेंडीसने या 182 धावांच्या खेळीत अनेक रेकॉर्ड उद्धवस्त केले. मेंडीस एकमेव फलंदाज आहे ज्याने पदार्पणापासून सलग 8 डावांमध्ये 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

2024 मध्ये सर्वाधिक शतकं

तसेच कामिंदु 1950 नंतर 13 डावात 1 हजार कसोटी धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. तसेच कामिंदु 2024 या वर्षात सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज ठरला. कामिंदुने इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट याला मागे टाकलं. मेंडीसने या वर्षात 5 कसोटी शतकं केली आहेत. तर जो रुट याने 4 शतकी खेळी केली आहे. तर शुबमन गिल, केन विलियमसन आणि ओली पोप या तिघांनी प्रत्येकी 3 वेळा शतक झळकावलं आहे.

कामिंदु मेंडीसचा धमाका सुरुच

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टीम साऊथी (कॅप्टन) टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के.

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, दिनेश चंडिमल, अँजेलो मॅथ्यूज, कामिंदू मेंडिस, कुसल मेंडीस (विकेटकीपर), मिलन प्रियनाथ रथनायके, प्रभाथ जयसूर्या, निशान पेरिस आणि असिथा फर्नांडो.