स्मृती-जेमिमा यांनी रोहित-हार्दिकला टाकली प्रश्नांची गुगली! मिळाली अशी उत्तरं

बीसीसीआयचा वार्षिक पुरस्कार सोहळा नमन मुंबईत सुरु आहे. या कार्यक्रमासाठी दिग्गज खेळाडूंची उपस्थिती आहे. यावेळी स्टेजवर एक मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी स्मृती मंधानाने कर्णधार रोहित शर्माला विसरभोळेपणावर प्रश्न विचारला. तेव्हा त्याने त्याच अंदाजात उत्तर दिलं.

स्मृती-जेमिमा यांनी रोहित-हार्दिकला टाकली प्रश्नांची गुगली! मिळाली अशी उत्तरं
Image Credit source: video grab
| Updated on: Feb 01, 2025 | 8:53 PM

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचा वार्षिक पुरस्कार सोहळा मुंबईत आहे. या कार्यक्रमात दिग्गज खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. वर्षभरात केलेल्या कामगिरीची दखल बीसीसीआयने घेतली. तसेच त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला. यावेळी मुंबईच्या तिन्ही संघांना बेस्ट देशांतर्गत संघाचा पुरस्कार मिळाला. मेन्स संघाने रणजी ट्रॉफी, सिनियर वुमन्स टी20 ट्रॉफी आणि विजय मर्चेंट ट्रॉफीवर ताबा मिळावला होता. तिघांना सर्वोत्तम कामगिरीसाठी पुरस्कार मिळाला. यानंतर स्टेजवर स्मृती मंधाना , जेमिमा रॉड्रिग्स, हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा यांच्यात छोटेखानी मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी स्मृती मंधानाने रोहित शर्माला काही प्रश्न विचारले. स्मृती मंधानाने विचारलं की तुला तुझे सहकारी कोणत्या बाबीवर चिडवतात? हा प्रश्न विचारताच समोर बसलेले त्याचे सहकारी हसू लागले. तेव्हा रोहित शर्मा म्हणाला की, ‘ते मला विसरभोळेपणावर चिडवतात. हा काही छंद नाही. तुम्ही मला ते कशावरून चिडवतात तर ते हे कारण आहे. मी वॉलेट विसरतो, कधी पासपोर्ट विसरतो. पण हे खरं नाही. हे असं दशकापूर्वी घडलं होतं. आता नाही.’

रोहित शर्माचं हे उत्तर ऐकून हार्दिक पांड्याने लगेच हाती माईक घेतला आणि म्हणाला ,’त्याला विचारा की इथे बसलेला असताना तो काही विसरला तर नाही ना..’ त्याची री ओढत पुन्हा एकदा स्मृतीने विचारलं की, सर्वात मोठी कोणती गोष्ट विसरला आहेस. ‘मी हे सांगू शकत नाही. हे लाईव्ह येईल. माझी बायको हा कार्यक्रम बघत असेल. मी हे सांगू शकत नाही. हे गुपित मी माझ्याकडेच ठेवतो.’

जेमिमा रॉड्रिग्सनेही हार्दिक पांड्याला काही प्रश्न विचारले. जेमिमाने सांगितलं की, तू सामन्यात शांत राहण्यासाठी काय करतो? तेव्हा हार्दिकने सांगितलं की, ‘खूप तयारी करावी लागते. यानेच मी प्रेशर सिच्युएशनमध्ये फोकस करतो. मी स्वत:वर विश्वास ठेवतो. मी लहानपणापासूनच पॉवर हिटिंगवर फोकस करत हे. त्याचा मला फायदा झाला.’ जेमिमाने पुढे विचारलं तर ट्राफीकमध्ये अडकला इतकं डोकं शांत ठेवू शकतो का? तेव्हा हार्दिक म्हणाला, ‘ट्राफीक तुमचं डोकं खराब करू शकते. खासरून मुंबईच्या ट्राफीकमध्ये धीर सुटू शकतो.’