Sourav Ganguly in controversy: सौरव गांगुलीवरुन BCCI मध्ये दोन गट? पुन्हा एकदा झाला मोठा आरोप

आता पुन्हा एकदा सौरव गांगुली मोठ्या वादामध्ये सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागच्या काही महिन्यांपासून विराटने टी-20 चे कर्णधारपद सोडल्यापासून भारतीय क्रिकेटमध्ये वादांची मालिका सुरु आहे.

Sourav Ganguly in controversy: सौरव गांगुलीवरुन BCCI मध्ये दोन गट? पुन्हा एकदा झाला मोठा आरोप
Sourav Ganguly
| Edited By: | Updated on: Feb 02, 2022 | 1:27 PM

मुंबई: भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात होण्याआधी तत्कालिन कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) एका विधानावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. BCCI मधून कोणीही मला टी-20 चं कर्णधारपद सोडू नकोस, असं म्हटलं नाही, असं विराटने सांगितलं. त्याआधी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) एका मुलाखतीत ‘मी विराटला कर्णधारपद सोडू नकोस, असं सांगितलं होतं’ असं म्हटलं होतं. पत्रकार परिषदेतील विराटच्या विधानामुळे नेमकं खरं कोण बोलतय, सौरव गांगुलीच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. आता पुन्हा एकदा सौरव गांगुली मोठ्या वादामध्ये सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागच्या काही महिन्यांपासून विराटने टी-20 चे कर्णधारपद सोडल्यापासून भारतीय क्रिकेटमध्ये वादांची मालिका सुरु आहे.

गांगुलीकडून मेसेजला रिप्लाय नाही
टी-20 वर्ल्डकपपासून टीम इंडिया सुद्धा खराब फॉर्ममध्ये आहे. आता सौरव गांगुलीवरुन मोठा वाद निर्माण झाला, तर त्याचा भारतीय क्रिकेटवर निश्चित चांगला परिणाम होणार नाही. निवड समितीच्या काही बैठकांना सौरव गांगुली जबरदस्ती उपस्थित राहिल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. इनसाइडस्पोर्टने या आरोपावर सौरव गांगुलीची बाजू जाणून घेण्यासाठी त्याच्याशी व काही बीसीसीआय पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. सौरव गांगुलीने त्याला पाठवलेल्या मेसेजला प्रत्युत्तर दिलं नाही. पण अन्य बीसीसीआय पदाधिकाऱ्यांनी हे दुर्देवी असल्याचं म्हटलं आहे.

दोन पदाधिकाऱ्यांची वेगवेगळी मत
बीसीसीआय निवड समितीच्या बैठकीला उपस्थित राहतो, ही चुकीची बातमी असून हा सर्व मूर्खपणा आहे, असं बीसीसीआय पदाधिकाऱ्याने म्हटलं आहे. “सौरव गांगुली जबरदस्तीने काही गोष्टी करुन घेतो. सध्या बीसीसीआयचा कारभार असाच सुरु आहे. निवड समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्याची गांगुलीला काही गरज नाही. हे खूपच दुर्देवी आहे” असं दुसऱ्या एका BCCI पदाधिकाऱ्याने म्हटलं आहे. इनसाइडस्पोर्टने हे वृत्त दिलं आहे.



कशावरुन सुरु झाला वाद

एका वरिष्ठ पत्रकाराच्या टि्वटवरुन हा सर्व वाद निर्माण झाला आहे. मागच्या काही काळापासून बीसीसीआयचे पदाधिकारी संघ निवडीमध्ये हस्तक्षेप करत असल्याचं टि्वट या पत्रकाराने केलं होतं. या बैठकींमध्ये आपलं काही काम नाही, हे माहित असूनही बीसीसीआयचे पदाधिकारी स्वत:च निवड समितीच्या बैठकींना उपस्थित राहतात असं या पत्रकाराचं म्हणणं होतं.