SA vs AUS Semi Final Live Score : दक्षिण अफ्रिका चोकर्सचा डाग पुसण्यात अपयशी, ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरी गाठली

South Africa vs Australia 2nd Semi-Final : वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे.

SA vs AUS Semi Final Live Score : दक्षिण अफ्रिका चोकर्सचा डाग पुसण्यात अपयशी, ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरी गाठली
| Edited By: | Updated on: Jun 04, 2024 | 7:03 AM

कोलकाता : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत दक्षिण अफ्रिकेचा तीन गडी राखून पराभव केला. या स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाचा हा सलग आठवा विजय आहे. पहिले दोन सामने गमवल्यानंतर ऑस्ट्रेलियाने जबरदस्त कमबॅक केलं आहे. 2003 नंतर ऑस्ट्रेलिया आणि भारत दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. आता 19 नोव्हेंबरला कोण बाजी मारणार? याबाबत क्रीडाप्रेमींना उत्सुकता आहे.