AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs DC Toss : दिल्लीच्या बाजूने सलग सहाव्या सामन्यात टॉसचा कॉल, कॅप्टन अक्षर म्हणाला..

Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals Toss and Playing 11 : अक्षर पटेल याच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिट्ल्सच्या बाजूने सलग सहाव्या सामन्यातही नाणेफेकीचा कौल लागला आहे. अक्षर पटेल याने प्लेइंग ईलेव्हनबाबत काय माहिती दिली? जाणून घ्या.

SRH vs DC Toss : दिल्लीच्या बाजूने सलग सहाव्या सामन्यात टॉसचा कॉल, कॅप्टन अक्षर म्हणाला..
SRH vs DC Toss IPL 2026Image Credit source: IPL X Account
| Updated on: Apr 21, 2026 | 8:05 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 31 व्या सामन्यात आज 21 एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने आहेत. दिल्लीचा हा या मोसमातील सहावा तर हैदराबादचा सातवा सामना आहे. उभयसंघातील सामन्याचं आयोजन हे हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. दिल्लीने टॉस जिंकला. दिल्ली कॅपिट्ल्सची 19 व्या मोसमात टॉस जिंकण्याची ही आतापर्यंत एकूण आणि सलग सहावी वेळ ठरली आहे. कॅप्टन अक्षर पटेल याने फिल्डिंगचा निर्णय घेत हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. यासह दिल्लीने सलग सहाव्या सामन्यातही चेजिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?

दिल्लीने हैदराबाद विरूद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. आकिब नबी याच्या जागी नितीश राणा याचा समावेश करण्याची माहिती कॅप्टन अक्षर पटेल याने दिली. तर हर्ष दुबे याचं हैदराबादच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कमबॅक झालंय.

हैदराबादमधील 2025 पासूनची आकडेवारी

आयपीएल स्पर्धेत 2025 पासून हैदराबादमधील या मैदानात 9 सामने खेळवण्यात आले आहेत. या 9 पैकी पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमचा 3 वेळा विजय झालाय. तर चेजिंग करणाऱ्या टीमने 5 सामन्यांमध्ये मैदान मारलंय. तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. तसेच या मैदानात 2025 पासून पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या ही 191 इतकी आहे. तर एकूण 5 वेळा पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमने 200 पेक्षा अधिक धावांचा डोंगर उभा केलाय. त्यामुळे हैदराबाद किती धावा करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

चौथ्या विजयासाठी टफ फाईट

दरम्यान हैदराबाद आणि दिल्ली दोन्ही संघांनी या मोसमात प्रत्येकी 3-3 सामने जिंकले आहेत. हैदराबाद पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या आणि दिल्ली कॅपिट्ल्स पाचव्या स्थानी आहे. त्यामुळे दोघांपैकी कोणता संघ आज आपल्या खात्यात 2 गुण जोडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : पथुम निसांका, केएल राहुल (विकेटकीपर), समीर रिझवी, नितीश राणा, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कॅप्टन), डेव्हिड मिलर, कुलदीप यादव, मुकेश कुमार, टी नटराजन आणि लुंगी एन्गिडी.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (कॅप्टन), हेनरिक क्लासेन, सलील अरोरा (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवांग कुमार, हर्ष दुबे, साकिब हुसेन आणि एशान मलिंगा.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...