IPL 2026: सनरायझर्स हैदराबादने सामना जिंकला पण अभिषेक शर्माला बसला दणका, झालं असं की…

आयपीएल 2026 स्पर्धेतील पहिला सामना गमावल्यानंतर सनरायझर्स हैदराबादची गाडी पुन्हा एकदा विजयी रूळावर आली आहे. दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. या सामन्यात अभिषेक शर्माने 48 धावांची खेळी केली. पण असं असूनही अभिषेक शर्माला दणका बसला आहे.

IPL 2026: सनरायझर्स हैदराबादने सामना जिंकला पण अभिषेक शर्माला बसला दणका, झालं असं की...
सनरायझर्स हैदराबादने सामना जिंकला पण अभिषेक शर्माला बसला दणका, झालं असं की...
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 03, 2026 | 3:35 PM

आयपीएल 2026 स्पर्धेत अभिषेक शर्मा पुन्हा एकदा फॉर्मात आल्याचं पाहायला मिळालं. पहिल्या सामन्यात काही खास करू शकला नव्हता. पण कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात त्याला सूर गवसला. त्याने या सामन्यात चांगली सुरूवात करून दिली. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादला या सामन्यात फायदा झाला. ईडन गार्डन्सवर 2 एप्रिल रोजी खेळलेल्या सामन्यात अभिषेक शर्मान आक्रमक फलंदाजी केली. त्याने 21 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने 48 धावा केल्या. त्याच्या योगदानामुळे सनरायझर्स हैदराबादचा विजय सोपा झाला. मात्र या सामन्यात योगदान देऊनही सलामीवीर अभिषेक शर्माचं नुकसान झालं आहे. कारण सामना संपल्यानंतर बीसीसीआयने त्याचा पगार कापल्याची घोषणा केली आहे. अभिषेक शर्माने ‘कोड ऑफ कंडक्ट’चं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे या सामन्याची पूर्ण मानधन त्याला मिळणार नाही.

अभिषेक शर्माचं किती मानधन कापणार?

आयपीएल सामन्यादरम्यान अभिषेक शर्माने असभ्य भाषेचा वापर केल्याचं उघड झालं. जे काही बोलला ते स्टम्प माइकमध्ये रेकॉर्ड झालं आहे. त्यामुळे त्यात दोषी आढळला आहे. आयपीएल कोड ऑफ कंडक्ट 2.3 अंतर्गत दोषी आढळला असून त्याच्या मानधनातून 25 टक्के रक्कम कापली जाणार आहे. आता प्रश्न असा आहे की, अभिषेक शर्माला आयपीएलच्या एका सामन्यातून किती मानधन मिळतं? त्याच्या मानधनातून किती रक्कम कापून त्याला मिळणार? असे एक ना अनेक प्रश्न आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार, आयपीएलच्या प्रत्येक सामन्यासाठी प्लेइंग 11 मधील प्रत्येक खेळाडूला 7.5 लाख रूपये मिळतात. स्पर्धेतील सर्व संघांना हा नियम लागू आहे. ही रक्कम खेळाडूच्या लिलाव रक्कमेपेक्षा वेगळी असते. म्हणजेच अभिषेक शर्माला केकेआर विरूद्धच्या सामन्यातून 7.5 लाख रूपये मिळणार होते.

बीसीसीआयने मानधनातून 25 टक्के रक्कम कापण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच 7.5 लाखातून 1,87,500 रुपयांची रक्कम कापली जाईल. अभिषेक शर्माच्या खात्यात 5 लाख 62 हजार 500 रूपये जमा होणार आहे. अभिषेक शर्माच्या मानधनातली रक्कम तरी कापली गेली. पण लेव्हल 1 मध्ये दोषी आढळल्याने त्याच्या खात्यात 1 डिमेरिट पॉइंट जोडला गेला आहे. 4 डिमेरिट पॉइंट्स जमा झाल्यानंतर कमीत कमी एका सामन्याची बंदी घातली जाते.

Follow Us