श्रीलंकेच्या अष्टपैलू क्रिकेटपटूचा अवघ्या 32 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

श्रीलंकेच्या क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू थिसारा परेराने (Thisara Perera) सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली

श्रीलंकेच्या अष्टपैलू क्रिकेटपटूचा अवघ्या 32 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
Thisara Perera
Follow us
| Updated on: May 03, 2021 | 8:09 PM

कोलंबो : श्रीलंकेच्या क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू थिसारा परेराने (Thisara Perera) सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. गुरुवारी निवड समितीच्या बैठकीपूर्वी परेरा याने निवृत्तीची घोषणा केली. श्रीलंकेचा संघ आगामी काळात बांगलादेश आणि इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी जाणार आहे. त्याअगोगरच परेराने निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने अनेक वेळा संघाचे नेतृत्वही केले होते. श्रीलंका क्रिकेटला (एसएलसी) पाठवलेल्या पत्रात परेराने म्हटलं आहे की, मला वाटते की निवृत्ती घेण्याची आणि युवा खेळाडूंना संधी देण्याची हीच योग्य वेळ आहे. 32 वर्षीय अष्टपैलू खेळाडूने 6 कसोटी, 166 एकदिवसीय आणि 84 टी-20 सामन्यांमध्ये श्रीलंकेचं प्रतिनिधित्व केलं आहे. (Sri Lanka All-Rounder Thisara Perera retires from international cricket)

परेरा पुढील काळात जगभरातील वेगवेगळ्या फ्रेंचायझीमधून क्रिकेट खेळणार आहे. तो 2014 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील संघाचा भाग होता. त्यावेळी भारत आणि बंग्लादेश दोन्ही संघांना पराभूत करून श्रीलंकेला विजय मिळवून देण्यात त्यांचं योगदान मोठं होतं. त्यासाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डानंही त्यांचं खूप कौतुक केलं होतं. परेराने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, मला अभिमान आहे 7 क्रिकेट विश्वचषक स्पर्धांमध्ये मला श्रीलंकेचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.

परेरानं आपण विविध फ्रेंचायझीमधून खेळणार असल्याचं जाहीर केलं आहे. तो लंका प्रीमियर लीगमध्ये स्टॅलियन्ससाठी खेळतो. आतापर्यंत आपल्या करियरमध्ये तो 6 कसोटी सामने खेळला आहे. त्यामध्ये त्याने 203 धावा केल्या आहेत, तसेच 11 विकेट्सदेखील घेतल्या आहेत. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे.

एसएलसीला पाठवलेल्या पत्रात परेराने म्हटलंय की, “मला अभिमान आहे की मी सात क्रिकेट विश्वचषक स्पर्धांमध्ये श्रीलंकेचे प्रतिनिधित्व करू शकलो आणि 2014 च्या बांगलादेशात खेळवण्यात आलेल्या टी – 20 विश्वचषक स्पर्धेत संघाच्या विजयात मोलाचे योगदान देऊ शकलो. माझ्या आयुष्यातील हा एक महत्वाचा क्षण आहे.”

भारताविरुद्ध पदार्पण

परेराने 2009 मध्ये श्रीलंकेकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. श्रीलंकेचा संघ तेव्हा भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळला होता. त्यानंतर ऑगस्ट 2010 मध्ये भारताविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात त्याने पहिल्यांदाच एकाच डावात 5 विकेट्स घेण्याची किमया केली होती. यासाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर भारताला त्या सामन्यात पराभवाची धूळ चाखावी लागली होती.

आयपीएलमध्येदेखील चांगली कामगिरीरी

थिसारा परेरा आयपीएलमध्ये 7 हंगामांमध्ये खेळला आहे. या 7 वर्षांमध्ये त्याने चेन्नई सुपरकिंग्स, कोची टस्कर्स केरला, मुंबई इंडियन्स, किंग्स इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स या संघांचं प्रतिनिधीत्व केलं आहे. या 7 वर्षांमध्ये तो 37 आयपीएल सामने खेळला आहे. या 37 सामन्यांमध्ये त्याने 31 विकेट्स मिळवल्या आहेत. 20 धावात 3 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. फलंदाजीत त्याने 30 डावांमध्ये 422 धावा जमवल्या आहेत.

परेराची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

या 32 वर्षीय श्रीलंकन अष्टपैलू खेळाडूने 6 कसोटी सामने, 161 एकदिवसीय आणि 79 टी – 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यामध्ये त्याने अनुक्रमे 203, 2338 आणि 1204 धावा जमवल्या आहेत. तसेच त्याने गोलंदाजीतही चमकदार कामगिरी केली आहे. त्याने कसोटी 11, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 175 आणि T20I मध्ये 51 विकेट्स मिळवल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 63 धावात 4 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 44 धावांत 6 बळी ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 24 धावात 3 बळी घेण्याची कामगिरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 75 धावा तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 140 धावा या त्याच्या सर्वोत्तम खेळी होत्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 1 शतक आणि 10 अर्धशतकं आहेत. तर टी-20 मध्ये त्याच्या नावावर 3 अर्धशतकं आहे.

संबंधित बातम्या

IPL मध्ये वात पेटली, KKR नंतर आता धोनीच्या CSK मध्ये कोरोनाचा प्रवेश, गोलंदाजी प्रशिक्षकासह तिघे पॉझिटिव्ह

KKR vs RCB IPL 2021 : आयपीएलच्या मैदानात कोरोनाची एण्ट्री, क्रिकेटपटूला कोरोना, कोलकाता विरुद्ध बंगळुरु सामना लांबणीवर

एकाच दिवसात IPL शी संबंधित 10 जणांना कोरोनाची बाधा, 2 संघ आणि एका मैदानाला कोरोनाचा विळखा, BCCI च्या चिंता वाढल्या

(Sri Lanka All-Rounder Thisara Perera retires from international cricket)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.