T20I World Cup 2024 : टी 20 वर्ल्ड कपसाठी श्रीलंका संघ जाहीर, कॅप्टन कोण?

Sri Lanka Squad World Cup 2024 Marathi News : श्रीलंका क्रिकेट संघाने टी 20 वर्ल्ड कपसाठी अनुभवी ऑलराउंडरचा समावेश केला आहे. पाहा टीम.

T20I World Cup 2024 : टी 20 वर्ल्ड कपसाठी श्रीलंका संघ जाहीर, कॅप्टन कोण?
sri lanka cricket teamImage Credit source: Icc X account
Follow us
| Updated on: May 09, 2024 | 8:44 PM

आगामी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला आता अवघे काही दिवस बाकी आहे. या स्पर्धेचं आयोजन हे 1 ते 29 जून दरम्यान अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. त्या 20 पैकी बहुतांश संघांनी आपल्या टीमची घोषणा केली आहे. आता 9 मे रोजी श्रीलंकाने 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीने सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे.

श्रीलंका क्रिकेट निवड समितीने नियमानुसार वर्ल्ड कपसाठी मुख्य संघात एकूण 15 खेळाडूंचा समावेश केला आहे. तर 4 खेळाडूंचा राखीव म्हणून समावेश करण्यात आला आहे. वानिंदु हसरंगा याला श्रीलंकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर चरिथ असलंका उपकर्णधारपदाची सूत्रं सांभाळणार आहे. श्रीलंका टीम वर्ल्ड कप मोहिमेसाठी 14 मे रोजी रवाना होईल.

श्रीलंका कोणत्या ग्रुपमध्ये?

वर्ल्ड कपमध्ये सहभागी एकूण 20 संघांना 5-5 नुसार 4 गटात विभागण्यात आलं आहे. त्यानुसार श्रीलंका डी ग्रुपमध्ये आहे. श्रीलंकेसह या ग्रुपमध्ये नेपाळ, नेदरलंड, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. श्रीलंका वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात 3 जूनपासून करणार आहे. श्रीलंका आपला पहिला सामना हा दक्षिण आफ्रिका विरुद्ध खेळणार आहे.

अँजलो मॅथ्यूजला संधी

दरम्यान निवड समितीने 36 वर्षीय अनुभवी ऑलराउंडर अँजलो मॅथ्यूज याला संधी दिली आहे. अँजलोचा हा सहावा टी 20 वर्ल्ड कप असणार आहे. श्रीलंकेने 2014 साली टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. अँजलो त्या वर्ल्ड कप विजयी संघाचा सदस्य होता. अँजलोसारखा अनुभवी खेळाडू टीममध्ये असल्याने श्रीलंकेला त्याचा किती फायदा होतो, याकडे लक्ष असेल.

श्रीलंका संघ जाहीर

श्रीलंकेच्या सामन्यांचं वेळापत्रक

सोमवार, 3 जून, विरुद्ध दक्षिण आफ्रिका शनिवारी, 8 जून, विरुद्ध बांगलादेश बुधवार, 12 जून, विरुद्ध नेपाळ सोमवार, 17 जून, नेदरलंड

आयसीसी टी 20 वर्ल्ड कपसाठी श्रीलंका टीम : वानिंदू हसरंगा (कर्णधार), चारिथ असलंका (विकेटकीपर), कुसल मेंडिस, पथुम निसांका, कामिंदू मेंडिस, सदीरा समरविक्रमा, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, धनंजया डी सिल्वा, महेश तीक्षना, दुनीथ नुशमान वेललागेरा, दुनीथ नुशमान चॅलेरा, नुशमन चॅलेस, मथीशा पथीराना आणि दिलशान मदुशंका.

राखीव खेळाडू : असिथा फर्नांडो, विजयकांत व्यासकांत, भानुका राजपक्षे आणि जेनिथ लियानागे.

Non Stop LIVE Update
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.
तर खूप जड जाणार,जरांगेंचा मुंडे बंधू भगिनींवर गंभीर आरोप अन दिला इशारा
तर खूप जड जाणार,जरांगेंचा मुंडे बंधू भगिनींवर गंभीर आरोप अन दिला इशारा.
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी.
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.