AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किंकाळ्या, आरडाओरड आणि हाहा:कार, भयानक अपघात, 17 मजुरांचा जागीच मृत्यू

पिकअपचं नियंत्रण सुटल्याने भीषण अपघाताची घटना घडली. ही पिकअप थेट 20 फूट खोल दरीत जावून कोसळली. या पिकअपमध्ये तब्बल 40 पेक्षा जास्त मजूर होते. अपघात इतका भीषण आहे की, तब्बल 17 जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर 20 पेक्षा जास्त जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामुळे मृतांच्या नातेवाईकांनी टाहो फोडलाय. अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड किंकाळ्या, आरडाओरड ऐकू आल्या आणि हाहा:कार माजला. या अपघातामुळे संपूर्ण देश सुन्न झालाय.

किंकाळ्या, आरडाओरड आणि हाहा:कार, भयानक अपघात, 17 मजुरांचा जागीच मृत्यू
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: May 20, 2024 | 4:32 PM
Share

छत्तीसगडच्या कवर्धा जिल्ह्यातील सुन्न करणारी घटना घडली आहे. कवर्धा जिल्ह्यातील बाहपानी परिसरात अपघाताची मोठी घटना घडली. या परिसरात पिकअप वाहन 20 फूट दरीत कोसळल्याने 17 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे छत्तीसगडसह संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात होती. पिकअपमधून प्रवास करणारे मजूर हे तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेले होते. या मजुरांची संख्या जवळपास 40 इतकी होती. हे सर्व मजूर तेंदुपत्ता तोडण्याचं काम आटोपून आपल्या घराकडे निघाले होते. ते पिकअप गाडीतून घरी जात होते. पण याच पिकअप गाडीचा भीषण अपघात झाला. पिकअपचं नियंत्रण सुटल्याने ही पिकअप रस्त्याच्या बाजूला असलेल्या 20 फूट खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात तब्बल 17 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर मजुरांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेमुळे संपूर्ण कवर्धा जिल्हा सुन्न झाला आहे.

सध्या तेंदु पत्ता संकलन हंगाम सुरू आहे. हे सर्व मजूर तेंदुपान संकलन करून परत येत होते. याच दरम्यान संबंधित घटना घडली. कुकदुर पोलीस ठाणे अंतर्गत बाहपानी डोंगराळ भागातून पिकअप वाहन जात होतं. याचदरम्याने चालकाचा पिकअपवरील ताबा सुटला आणि ही गाडी दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचं पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी बचावकार्य सुरू केलं आणि पिकअपखाली दबलेल्या मजुरांना कसंतरी बाहेर काढलं. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अपघाताचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये कामगार पिकअपजवळ पडलेले दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कामगार आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पिकअपमध्ये जंगलातून तेंदूपत्ता तोडून परतत होते. पिकअपमध्ये सुमारे 40 मजूर होते. दरम्यान, वाटेत पिकअपचे नियंत्रण सुटले आणि 20 फूट खोल दरीत पडली. या अपघातात 17 मजुरांचा चिरडून मृत्यू झाला. तर 20 हून अधिक कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती नेमकी कशी झाली?

अपघातानंतर घटनास्थळी राडा झाला. आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या गावातील लोक घटनास्थळी पोहोचले. लोकांनी याची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पोलीस ठाणे गाठून वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. स्थानिक लोकांच्या मदतीने पिकअपखालून कामगारांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. काही वेळाने इतर पोलीस ठाण्यांतील पोलीस दलासह वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्व जखमी मजुरांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

पिकअपमध्ये प्रवास करणारे सर्व जण सेमहरा गावचे रहिवासी आहेत. या हंगामात तेंदूपत्ता गोळा करण्याचे काम गावकरी करतात. त्यामुळे आज सकाळी जवळपास 40 आदिवासी स्त्री-पुरुष पिकअपमधून तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेले होते. हे सर्वजण दुपारी अडीचच्या सुमारास परतत होते. दरम्यान, बहापाणी गावाजवळ वाहनावरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या 20 फूट खोल दरीत पडल्याने हा भीषण अपघात झाला.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ