श्रीलंकन संघात उलथापालथ! कुसल मेंडिसच्या खांद्यावर संघाची धुरा; आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूचा पत्ता कट

आयपीएल 2026 स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बरंच काही घडताना दिसत आहे. श्रीलंकेने आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. कुसल मेंडिसच्या खांद्यावर धुरा सोपवण्यात आली आहे.

श्रीलंकन संघात उलथापालथ! कुसल मेंडिसच्या खांद्यावर संघाची धुरा; आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूचा पत्ता कट
श्रीलंकन संघात उलथापालथ! कुसल मेंडिसच्या खांद्यावर संघाची धुरा; आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूचा पत्ता कट
Image Credit source: Getty Images
| Updated on: May 26, 2026 | 6:20 PM

Kusal Mendis Captain: जून महिन्यापासून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांना सुरूवात होणार आहे. श्रीलंकन संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात तीन वनडे, तीन टी20 आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या तिन्ही फॉर्मेटसाठी श्रीलंकेने संघाची घोषणा केली आहे. वनडे आणि टी20 मालिकेसाठी अर्थात व्हाईट बॉल क्रिकेटसाठी नवा कर्णधार असणार आहे. कुसल मेंडिसच्या खांद्यावर वनडे आणि टी20 संघाची धुरा असेल. कुसल मेंडिसने यापूर्वी वनडे संघाची धुरा सांभाळली आहे. त्याने 17 वनडे सामन्यात संघाचं नेतृत्व केलं आहे. पण टी20 संघाची धुरा पहिल्यांदाच सांभाळणार आहे. त्याच्याकडे दोन फॉर्मेटची धुरा सोपवल्याने चरित असलंका आणि दासुन शनाका यांची कर्णधारपदावरून गच्छंती झाली आहे. दासुन शनाका राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत आहे.

दरम्यान, वानिंदु हसारंगा याचं वनडे आणि टी20 संघात कमबॅक झालं आहे. तर आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादसाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या इशान मलिंगाला वनडे आणि टी20 संघात जागा मिळाली आहे. तर दुष्मंता चमीरा याला फक्त वनडे संघात स्थान मिळालं आहे. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाकडून नुवान तुषाराला आयपीएल खेळण्यासाठी एनओसी मिळाली नव्हती. त्यानंतर बराच वाद झाला होता. पण त्याला आता श्रीलंकेच्या टी20 संघात सहभागी केलं आहे. लसिथ क्रुस्पुल्लेला तीन वर्षांनी टी20 संघाचं दार उघडलं आहे. निशान मधुशंका आणि रमेश मेंडिस यांना कसोटी संघात स्थान मिळालं आहे.

श्रीलंकेचा वनडे संघ:  पाथुम निसांका, कामिल मिशारा, पवन रथनायके, कुसल मेंडिस (कर्णदार), जेनिथ लियानाज, चैरिथ असलांका, कामिंदु मेंडिस (उपकर्णधार), मिलन रथनायके, वानिंदु हसरंगा, डुनिथ वेलालेज, महेश थीक्षाना, दुष्मंता चमीरा, दिलशान मदुशंका, इशान मलिंगा, असिता फर्नांडो, प्रमोद मदुशन.

श्रीलंकेचा टी20 संघ : पाथुम निसांका, कामिल मिशारा, लसिथ क्रूसपुले, पवन रथनायके, कुसल मेंडिस (कर्णधार), कामिंदु मेंडिस (उपकर्णधार), दासुन शनाका, मिलन रथनायके, डुनिथ वेललेज, वानिंदु हसरंगा, महीश तीक्षणा, दुशमंथा चमीरा, दिलशान मदुशंका, इशान मलिंगा, बिनुरा फर्नांडो, नुवान तुषारा.

श्रीलंकेचा कसोटी संघ : पाथुम निसांका, लाहिरू उदारा, निशान मदुष्का, दिनेश चंडीमल, पसिंदु सोरियाबंदरा, कामिंदु मेंडिस (उपकर्णधार), सोनल दिनुशा, कुसल मेंडिस, धनंजय डी सिल्वा (कर्णधार) , मिलन रथनायके, प्रभात जयसूर्या, रमेश मेंडिस, असिता फर्नांडो, विश्वा फर्नांडो, लाहिरू कुमारा, इसिथा विजेसुंदरा, कासुन राजिथा.

Follow Us