AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BBL 2026: बाबर आझमची सर्वांसमोर लाज काढली! स्टीव्ह स्मिथने मैदानातच केलं असं Video Viral

Babar Azam Viral Video: बिग बॅश लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडू लाज घालण्यासाठीच खेळत असल्याचं दिसत आहे. आता पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम याची सर्वांसमोर लाज काढल्याचं पाहायला मिळालं. त्याची संथ फलंदाजी पाहून स्टीव्ह स्मिथने एक धाव घेण्यास नकार दिला.

BBL 2026: बाबर आझमची सर्वांसमोर लाज काढली! स्टीव्ह स्मिथने मैदानातच केलं असं Video Viral
BBL 2026: बाबर आझमची सर्वांसमोर लाज काढली! स्टीव्ह स्मिथने मैदानातच केलं असं Video ViralImage Credit source: Ayush Kumar/Getty Images
| Updated on: Jan 16, 2026 | 7:20 PM
Share

Steven Smith Denied A Single To Babar Azam: बिग बॅश लीग स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंमुळे फ्रेंचायझींच्या डोक्याला ताप झाला आहे. कारण हे खेळाडू विजय तर सोडा, पराभवासाठी कारणीभूत ठरत आहे. प्रत्येक सामन्यात काही ना काही उदाहरण पाहायला मिळत आहे. बिग बॅश लीग स्पर्धेच्या 37व्या सामन्यात असंच चित्र पाहायला मिळालं. सिडनी सिक्सर्स आणि सिडनी थंडर यांच्यात सिडनी क्रिकेट मैदानात सामना पार पडला. या सामन्यात एका घटनेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सामन्याच्या 11व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर स्टीव्ह स्मिथने एक धाव घेण्यास नकार दिला. बाबर आझमची संथ फलंदाजी पाहून स्मिथ वैतागलेला दिसला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नाणेफेकीचा कौल सिडनी सिक्सर्सने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. सिडनी थंडरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 189 धावा केल्या आणि विजयासाठी 190 धावा दिल्या. डेविड वॉर्नरने या सामन्यात 65 चेंडूत 11 चौकार आणि 4 षटकार मारत नाबाद 110 धावा केल्या. विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी सिडनी सिक्सर्स संघ उतरला. पाकिस्तानचा बाबर आझम आणि स्टीव्ह स्मिथ सलामीला आले. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 141 धावांची भागीदारी केली. पण बाबर आझमने 39 चेंडूत 7 चौकार मारत 47 धावा केल्या. 11 व्या षटकात स्टीव्ह स्मिथ बाबर आझमवर वैतागला. या षटकात त्याने तीन चेंडू निर्धाव घालवले. शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक फिरवण्यासाठी सिंगल घेण्याच्या प्रयत्नात होता. पण स्मिथने धाव घेण्यास नकार दिला. त्यामुळे बाबर आझम वैतागलेला दिसला.

स्टीव्ह स्मिथने बाबर आझमची लाज काढली?

स्टीव्ह स्मिथने हा निर्णय पावर सर्ज नियमामुळे घेतला. पॉवर सर्ज म्हणजेच यात सुरुवातीचे चार षटकं पावरप्ले खेळल्यानंतर 11 व्या षटकानंतर कधीही दोन षटकांचा पावरप्ले घेऊ शकतो. त्यामुळे 30 यार्डच्या बाहेर फक्त दोन खेळाडू ठेवले जातात. स्टीव्ह स्मिथ त्याचा फायदा उचलू इच्छित होता. स्टीव्ह स्मिथने 12 व्या षटकात या स्थितीचा लाभ उचलत एकूण 32 धावा काढल्या. पण असं असूनही बाबर आझम संतापलेलाच दिसला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...