AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BBL : बाबर रिझवाननंतर आणखी एका पाकिस्तानी खेळाडूने बीबीएलमध्ये केलं हासं, जाणून घ्या Video

बिग बॅश लीग स्पर्धेत पाकिस्तानच्या खेळाडूंनी जगासमोर हासं केलं आहे. मग बाबर आझम असो की मोहम्मद रिझवान यांनी पुरती लाज घालवली आहे. आता यात आणखी एका खेळाडूची भर पडली आहे. पाकिस्तानची फिल्डिंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे. चला जाणून घेऊयात..

BBL : बाबर रिझवाननंतर आणखी एका पाकिस्तानी खेळाडूने बीबीएलमध्ये केलं हासं, जाणून घ्या Video
बाबर रिझवाननंतर आणखी एका पाकिस्तानी खेळाडूने बीबीएलमध्ये केलं हासं, जाणून घ्या VideoImage Credit source: video grab/Twitter
Rakesh Thakur
Rakesh Thakur | Updated on: Jan 14, 2026 | 5:42 PM
Share

बिग बॅश लीग 2025-26 स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंची चर्चा होत आहे. त्याला कारणही तसंच आहे. त्याच्या खराब प्रदर्शनामुळे चर्चेचे विषय ठरले आहेत. बिग बॅश लीग स्पर्धेत पाकिस्तानी संघाचे दिग्गज खेळाडू खेळत आहेत. यात मोहम्मद रिझवान, बाबर आझम, हारिस रऊफ आणि हसन अली यांची नावं समाविष्ट आहेत. पण हे खेळाडू सुमार कामगिरीसाठी प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. बाबर आझमचा स्ट्राईक रेट आणि फलंदाजी पाहून बीबीएल चाहत्यांनी डोक्यावर हात मारून घेतला आहे. दुसरीकडे, मोहम्मद रिझवानची संथ फलंदाजी पाहून कर्णधाराने त्याला रिटायर्ड आऊट होण्यास भाग पाडलं. त्यामुळे संपूर्ण जगासमोर त्याची नाचक्की झाली. असं असताना आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात पाकिस्तानच्या खेळाडूची क्षेत्ररक्षण पाहून हास्यास कारण ठरलं आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून हसन अली आहे. त्याचं क्षेत्ररक्षण पाहून खिल्ली उडवली जात आहे.

बीबीएल स्पर्धेतील 34वा सामना एडिलेड स्ट्रायकर्स आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात पार पडला. या सामन्यात एडिलेडचा संघ 83 धावा करून शकला. मेलबर्न स्टार्सने हे सोपं आव्हान गाठण्यास सुरुवात केली. या डावात्या आठव्या षटकात हसन अली गचाळ क्षेत्ररक्षण केलं. आठवं षटक तबरेज शम्सी टाकत होता. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर थॉमस रॉजर्सने वाइड एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू फटकावला. त्यानंतर हसन अलीने हा चेंडू रोखण्यासाठी धाव घेतली. चेंडूजवळ पोहोचला, पण चेंडू काही अडवू शकला नाही. त्यामुळे चौकार मिळाला. त्याचं क्षेत्ररक्षण पाहून आता त्याची खिल्ली उडवली जात आहे.

मेलबर्न स्टार्सने एडिलेड स्ट्रायकर्सला 6 विकेट राखून पराभूत केलं. या पराभवासह एडिलेड स्ट्रायकर्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. खरं तर हा सामना करो या मरोची लढाई होती. पण फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही क्षेत्रात सुमार कामगिरी केली. त्यामुळे पराभवाचं तोंड पाहावं लागलं. एडिलेड स्ट्रायकर्सने या स्पर्धेत एकूण 9 सामने खेळले. यात सहा सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. तसेच फक्त तीन सामन्यात विजय मिळवला. आता एडिलेड स्ट्रायकर्स या स्पर्धेतील शेवटचा आणि औपचारिक समना 17 जानेवारील मेलबर्न रेनेगेड्सविरुद्ध खेळणार आहे.

सिंचन योजनेत 110 कोटींचा घोटाळा, पवारांच्या आरोपांवर काय म्हणाले खडसे?
सिंचन योजनेत 110 कोटींचा घोटाळा, पवारांच्या आरोपांवर काय म्हणाले खडसे?.
येवल्यात तीन दिवसीय पतंग महोत्सवाची धूम
येवल्यात तीन दिवसीय पतंग महोत्सवाची धूम.
अपरात्री शेतातून येतो कुत्र्यांचा, माणसाचा आवाज... शेतकऱ्यांची शक्कल
अपरात्री शेतातून येतो कुत्र्यांचा, माणसाचा आवाज... शेतकऱ्यांची शक्कल.
मनपा निवडणुकीला काही तास शिल्लक असताना शिंदेंचा ठाकरेंना धक्का
मनपा निवडणुकीला काही तास शिल्लक असताना शिंदेंचा ठाकरेंना धक्का.
..म्हणून आता मंदिरात वणवण फिरतायत! आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंवर निशाणा
..म्हणून आता मंदिरात वणवण फिरतायत! आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंवर निशाणा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन उत्साहात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन उत्साहात.
ठाकरे बंधू एकत्र येणं म्हणजे भीतीसंगम! फडणवीसांची टीका
ठाकरे बंधू एकत्र येणं म्हणजे भीतीसंगम! फडणवीसांची टीका.
काँग्रेस जिंकते तेव्हा.... PADUच्या वादावर भाजपचं प्रत्युत्तर
काँग्रेस जिंकते तेव्हा.... PADUच्या वादावर भाजपचं प्रत्युत्तर.
उद्या मतदान, अनेक भागात पैसे वाटल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
उद्या मतदान, अनेक भागात पैसे वाटल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?.
त्यांची डोर आमच्या हातात आहे! शिरसाट यांचा इम्तियाज जलील यांना टोला
त्यांची डोर आमच्या हातात आहे! शिरसाट यांचा इम्तियाज जलील यांना टोला.