AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘द केरळ स्टोरी 2’मधील 4 मिनिटांचा सीन पाहून अंगावर काटा; प्रेक्षक म्हणाले ‘नाही होत सहन’

कामाख्या नारायण सिंह दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी 2' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकूनही थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. काहीजण या चित्रपटाच्या कथेचं कौतुक करत आहेत, तर काहीजण त्यावर टीका करत आहेत. अशातच या चित्रपटातील एक सीन पाहून प्रेक्षक प्रचंड भावूक झाले आहेत.

'द केरळ स्टोरी 2'मधील 4 मिनिटांचा सीन पाहून अंगावर काटा; प्रेक्षक म्हणाले 'नाही होत सहन'
The Kerala Story 2Image Credit source: Twitter
| Updated on: Mar 04, 2026 | 11:36 AM
Share

विपुल शाह निर्मित आणि कामाख्या नारायण सिंह दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी 2’ हा चित्रपट 28 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. त्याच्या काही दिवसांनीच 3 मार्च रोजी मद्रास उच्च न्यायालयाने इंटरनेट सेवा प्रदान करणाऱ्यांना आणि केबल टेलिव्हिजन ऑपरेटर्सना या चित्रपटाचं बेकायदेशीरपणे प्रसारण करण्यास मनाई केली. अशातच ज्या प्रेक्षकांन हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला, त्यांनी त्यातील एक सीन सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. हा सीन सध्या तुफान चर्चेत आहे. जवळपास चार मिनिटांच्या या सीनबाबत सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. या सीनमधील डायलॉग इतके विचित्र आहेत की नेटकऱ्यांनाही त्यावर प्रतिक्रिया देण्याचा मोह आवरला नाही.

या क्लिपमध्ये दाखवण्यात आलं आहे की कशाप्रकारे एका मुलीला जाळ्यात अडकवून आणलं जातं. तिथे जातीच्या नावावर मुलींच्या रेटची (किंमत) चर्चा होते आणि त्यानंतर त्या मुलीसोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या जातात. हे दृश्य पाहिल्यानंतर नेटकरी त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. ‘मला क्षणभर असं वाटलं की कोणीतरी तिला वाचवेल, परंतु सत्याने माझ्या तोंडावर चपराक लगावली’, असं एकाने लिहिलं. तर ‘हे पाहणं खूप वेदनादायी आहे. कृपया तुमच्या मुलींना हा चित्रपट दाखवा’, असं दुसऱ्याने म्हटलं आहे.

विरोध आणि वादानंतरही ‘द केरळ स्टोरी 2’च्या कमाईची सुरुवात समाधानकारक झाली. सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाने सोमवारी 4 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने भारतात 16.65 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जगभरातील कमाईचा आकडा 19.75 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

केरळ उच्च न्यायालयाच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगितीचे आदेश दिले होते. त्यानंतर चित्रपटाच्या टीमने दोन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर पुन्हा अपील केलं. रात्री उशिरापर्यंत झालेल्या या सुनावणीनंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यामुळे शुक्रवारी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होईल की नाही, हे स्पष्ट झालं नव्हतं. यामुळे शुक्रवारी सकाळी काही ठिकाणी चित्रपटाच्या तिकिटांची विक्री झाली नाही. 2023 मध्येही ‘द केरळ स्टोरी’च्या प्रदर्शनापूर्वी अशाच प्रकारे वाद झाला होता. परंतु अदा शर्माच्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 8 कोटी रुपये कमावले होते.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा