AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘यशस्वी’ जैस्वाल, या दिग्गज खेळाडूला सोडलं मागे

यशस्वी जैस्वालनं नाबाद 209 धावांवर सामन्याचा तिसरा दिवस संपवला. सर्फराज खान 30 धावा करून नाबाद राहिला. याचवेळी दुलिफ ट्रॉफीमध्ये यशस्वीनं एक मोठी कामगिरी केली आहे. याविषयी अधिक जाणून घ्या... 

'यशस्वी' जैस्वाल, या दिग्गज खेळाडूला सोडलं मागे
'यशस्वी' जैस्वालImage Credit source: social
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Sep 23, 2022 | 8:13 PM
Share

नवी दिल्ली :  दुलीप ट्रॉफीच्या (Duleep Trophy) अंतिम फेरीत पश्चिम विभागाचा सामना दक्षिण विभागाशी होतोय. ही स्पर्धा कोईम्बतूरमध्ये खेळवली जातेय. या सामन्यात पश्चिम विभागानं आपली स्थिती मजबूत केलीय. यात एक विशेष कामगिरी घडली. यशस्वी जैस्वालनं (Yashasvi Jaiswal) शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताचा माजी कर्णधार अजित वाडेकरांचा (Ajit Wadekar) विक्रम मोडलाय. पहिल्या श्रेणी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात द्विशतक झळकावणारा जैस्वाल हा सर्वात तरुण भारतीय फलंदाज ठरलाय.

20 वर्षे 354 दिवस

यशस्वीनं वयाच्या 20 वर्षे 269 दिवसांत हे काम केलंय. वाडेकर यांनी वयाच्या 20 वर्षे 354 दिवसांत हे काम केलंय. 1962 मध्ये बॉम्बेकडून राजस्थानविरुद्ध खेळताना त्याने शतक झळकावलं होतं.

द्विशतक ठोकले

जैस्वालनं नाबाद 209 धावांवर सामन्याचा तिसरा दिवस संपवला. सर्फराज खान 30 धावा करून नाबाद राहिला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा पश्चिम विभागाने तीन गडी गमावून 376 धावा केल्या आणि दक्षिण विभागावरील आपली आघाडी 319 धावांपर्यंत वाढवली.

दिवसाची सुरुवात दक्षिण विभागाकडून करण्यात आली. त्यावेळी त्यांची धावसंख्या सात गडी गमावून 318 धावा होती. पण अवघ्या नऊ धावांत त्याने उर्वरित तीन विकेट गमावल्या आणि पहिल्या डावात 327 धावांत गुंडाळले.

कडवी परीक्षा

पश्चिम विभागाची फलंदाजी आली आणि सलामीवीर जयस्वालनं सुरुवातीपासूनच दक्षिण विभागाच्या गोलंदाजांची कडवी परीक्षा घेतली. त्यानं वेगाने धावा केल्या. दिवसाचा खेळ संपेपर्यंत जयस्वालनं 244 चेंडू खेळले असून 23 चौकार आणि तीन षटकार ठोकले आहेत.

श्रेयसचं अर्धशतक

श्रेयस अय्यरनेही शानदार खेळी करत अर्धशतक झळकावलंय. त्यानं 113 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीनं 71 धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणे 15 धावांच्या पुढे जाऊ शकला नाही.

जैस्वाल आणि अय्यर हे दोघेही पहिल्या डावात अपयशी ठरले. जैस्वालला एकच धाव करता आली. त्यानंतर अय्यरच्या बॅटमधून 37 धावा आल्या. हेत पटेलने 98 धावा करत पश्चिम विभागाला पहिल्या डावात 270 धावांपर्यंत नेले.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती