AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs RCB Live Streaming : हैदराबाद-बंगळुरु यांच्यात कडवी झुंज, सामना किती वाजता?

Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bengaluru IPL 2026 Live Scorecard: क्रिकेट चाहत्यांना 22 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद असा सामना पाहायला मिळणार आहे. हा सामना हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

SRH vs RCB Live Streaming : हैदराबाद-बंगळुरु यांच्यात कडवी झुंज, सामना किती वाजता?
Rajat Patidar and Ishan Kishan RCB vs SRHImage Credit source: Bcci
| Updated on: May 21, 2026 | 11:09 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 68 व्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. या सामन्यात 2 आयपीएल चॅम्पियन्स संघ आमनेसामने असणार आहेत. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात टफ फाईट होणार आहे. पॅट कमिन्स सनरायझर्स हैदराबादचं नेतृत्व करणार आहे. तर रजत पाटीदार याच्याकडे आरसीबीच्या कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील साखळी फेरीतील 14 वा आणि शेवटचा सामना असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा साखळी फेरीचा शेवट विजयाने करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे चाहत्यांना चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने उभयसंघातील सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना कधी?

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना शुक्रवारी 22 मे रोजी होणार आहे.

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना कुठे?

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्याचं आयोजन हे हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु लाईव्ह मॅच मोबाईलवर कुठे पाहता येईल?

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु लाईव्ह मॅच जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

हेड टु हेड रेकॉर्ड्स, दोघांपैकी कोण वरचढ?

दरम्यान सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील हा 28 वा सामना असणार आहे. याआधी उभयसंघात एकूण 27 सामने खेळवण्यात आले आहेत. आकडेवारी पाहता दोन्ही संघ तुल्यबल असल्याचं स्पष्ट होतं. आरसीबीने 12 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर हैदराबादने आरसीबीचा 13 सामन्यांत धुव्वा उडवला आहे. त्यामुळे आता 28 व्या सामन्याचा निकाल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल