Suryakumar Yadav: असा SIX तुम्ही पाहिलाय का? हे काम सूर्यकुमारच करु शकतो VIDEO

| Updated on: Nov 06, 2022 | 4:33 PM

Suryakumar Yadav: एकदा लिंकवर क्लिक करुन सूर्यकुमारने मारलेला हा जबरदस्त SIX पाहा.

Suryakumar Yadav: असा SIX तुम्ही पाहिलाय का? हे काम सूर्यकुमारच करु शकतो VIDEO
Suryakumar yadav
Image Credit source: icc
Follow us on

मेलबर्न: यंदाच्या T20 वर्ल्ड कपच वैशिष्ट्य म्हणजे सूर्यकुमार यादव. ऑस्ट्रेलियात वेगवान खेळपट्ट्यांवर सूर्यकुमार सहज फलंदाजी करतोय. पाकिस्तान विरुद्धचा पहिला सामना सोडल्यास त्याचा फॉर्म कायम आहे. पहिले तीन-चार विकेट गेल्यानंतरही सूर्यकुमारच्या बॅटिंगमुळे टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारता येतेय. आजच्या झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यातही तेच झालं.

सूर्यकुमारच्या बॅटिंगला तोड नाहीय

केएल राहुल, विराट कोहली आणि ऋषभ पंत ठराविक अंतराने बाद झाल्यानंतरही सूर्यकुमार यादवने डाव सावरला. त्याने एकाबाजूने धावगती मंदावणार नाही याची काळजी घेतली. सूर्यकुमारची बॅटिंग बघणं एक सुंदर अनुभव असतो. आजही सूर्यकुमारने केलेल्या बॅटिंगला तोड नाहीय.

क्लासिक बॅटिंगचा अनुभव

त्याच्या भात्यातील फटके पाहून क्रिकेटरसिकही अंचबित होतात. तो अगदी सहजतेने थर्ड मॅन, फाइन लेगला सिक्स मारतो. चेंडूचा वेग पकडून सहजतेने चेंडू तो सीमारेषेपार पोहोचवतो. सूर्यकुमारची आजची बॅटिंगही तशीच होती. मॅच पाहणाऱ्यांनी सूर्यकुमार यादवच्या क्लासिक बॅटिंगचा अनुभव घेतला.

सूर्यकुमार यादव जबरदस्त SIX पाहण्यासाठी इथे क्लिक करा

244 च्या स्ट्राइक रेटने धावा

झिम्बाब्वे विरुद्ध सूर्यकुमार यादवने 25 चेंडूत नाबाद 61 धावा फटकावल्या. यात 6 चौकार आणि 4 षटकार आहेत. त्याच्या फटेकबाजीमुळे टीम इंडियाने 5 बाद 186 धावांपर्यंत मजल मारली. 244 च्या स्ट्राइक रेटने त्याने झिम्बाब्वेची गोलंदाजी फोडून काढली.

एकावर्षात 1,000 धावा

लेफ्टी वेगवान बॉलरला लास्ट बॉलवर त्याने मारलेला सिक्स अप्रतिम होता. असा शॉट फक्त सूर्यकुमार यादवच खेळू शकतो. त्याला उगाच मिस्टर 360 बोलत नाही, याची प्रचिती येते. सूर्यकुमार यादवने टी 20 क्रिकेटमध्ये आज एकवर्षात 1हजार धावांचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे.

आज लास्ट ओव्हरमध्ये टीम इंडियाने 21 धावा काढल्या. सूर्यकुमारने या ओव्हरमध्ये 2 सिक्स आणि 1 चौकार लगावला. फाइन लेगला त्याने मारलेला स्कूप सिक्स लाजवाब होता.