Ranji Trophy: मुंबईचा नवीन हिरो Suved parker, डेब्यु मॅचमध्येच ठोकल्या 252 धावा, 28 वर्षापूर्वीच्या रेकॉर्डशी बरोबरी

| Updated on: Jun 07, 2022 | 4:29 PM

रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trohpy) क्वार्टर फायनल राऊंडमध्ये चांगल्या दर्जाचं क्रिकेट पहायला मिळतय. बंगळुरु येथे मुंबई आणि उत्तराखंडमध्ये (Mumbai vs Uttarakhand) सामना सुरु आहे.

Ranji Trophy: मुंबईचा नवीन हिरो Suved parker, डेब्यु मॅचमध्येच ठोकल्या 252 धावा, 28 वर्षापूर्वीच्या रेकॉर्डशी बरोबरी
Suved parker
Image Credit source: MCA Twitter
Follow us on

मुंबई: रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trohpy) क्वार्टर फायनल राऊंडमध्ये चांगल्या दर्जाचं क्रिकेट पहायला मिळतय. बंगळुरु येथे मुंबई आणि उत्तराखंडमध्ये (Mumbai vs Uttarakhand) सामना सुरु आहे. या सामन्यात मुंबईच्या 21 वर्षाच्या सुवेद पारकरने (Suved parker) इतिहास रचला आहे. सुवेदने आपल्या डेब्यू मॅचमध्येच डबल सेंच्युरी झळकावली आहे. सुवेदने ही कामगिरी करताना आपले कोच अमोल मजूमदार यांच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. सुवेद पारकरने जबरदस्त फलंदाजी केली. त्याने 252 धावा फटकावल्या. या खेळीत त्याने 21 चौकार आणि चार षटकार लगावले. सुवेद 400 पेक्षा जास्त चेंडू खेळला आहे. रणजी स्पर्धेत डेब्यु करताना नॉकआऊट मॅचमध्ये डबल सेंच्युरी झळकावणारा सुवेद दुसरा क्रिकेटपटू बनला आहे. मुंबईने पहिल्या डावात उत्तराखंडसमोर आठ बाद 647 धावांचा डोंगर उभा केला आहे. मुंबईकडून सर्फराज खानने सुद्धा 153 धावांची खेळी केली.

अजब योगायोग कोचशी बरोबरी

सुवेदच्या आधी रणजीमध्ये मुंबईच्या अमोल मजूमदारने हरयाणा विरुद्ध 260 धावा केल्या होत्या. 1994 साली हा सामना झाला होता. अजब योगायोग म्हणजे 28 वर्षानंतर अमोल मजूमदार मुंबईच्या रणजी संघाचे कोच आहेत. ते कोच असताना सुवेदने हा इतिहास रचला आहे.

सूर्यकुमार यादवनेही दिल्या शुभेच्छा

फर्स्ट क्लासमध्ये डेब्यू मध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड सकिबुल गनीच्या नावावर आहे. ज्याने याच सीजनमध्ये 341 धावा फटकावल्या होत्या. तो नॉकआऊट सामना नव्हता. सुवेद पारकरने नॉकआऊट मॅचमध्ये डबल सेंच्युरी झळकावली आहे. सुवेदच्या या कामगिरीने क्रिकेट चाहते भारावून गेले आहेत. सूर्यकुमार यादवनेही टि्वट करुन सुवेद पारकरला शुभेच्छा दिल्या आहेत. हा एक ड्रीम डेब्यु असल्याचं म्हटलं आहे. सोशल मीडियावरही फॅन्स सुवेदवर कौतुकाचा वर्षाव करतायत.

फर्स्ट क्लासमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

341 सकिबुल गनी (2022)

267 अजय रोहेरा (2018)

260 अमोल मजूमदार (1994)

256 बाहिर शाह (2017)

240 एरिक मार्क्स (1920)