AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suryakumar Yadav : 3 चौकार-4 षटकार, सूर्याची कॅप्टन्सी जाताच वादळी खेळी, पाहा व्हीडिओ

Suryakumar Yadav Wankhede Stadium : सूर्यकुमार यादव याने वानखेडे स्टेडियममध्ये श्रेयस अय्यर याच्या टीम विरुद्ध टी 20 मुंबई लीग स्पर्धेत 48 धावांची खेळी साकारली.

Suryakumar Yadav : 3 चौकार-4 षटकार, सूर्याची कॅप्टन्सी जाताच वादळी खेळी, पाहा व्हीडिओ
Indian Cricket Team Suryakumar YadavImage Credit source: PTI
| Updated on: Jun 07, 2026 | 3:28 PM
Share

सूर्यकुमार यादव गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने अपयशी ठरत होता. सूर्याला टीम इंडियासाठी खेळताना काही खास करता आलं नाही. इतकंच नाही तर सूर्याला आयपीएल स्पर्धेत बॅटने अपवाद वगळता मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे बीसीसीआयने निवड समितीने सूर्याला 6 जून रोजी भारतीय टी 20I क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरुन हटवलं. सूर्याच्या जागी श्रेयस अय्यर याला कर्णधारपदाची सूत्र देण्यात आली. मात्र कर्णधारपदावरुन हटवताच सूर्याला सूर गवसला आणि त्याने वादळी खेळी साकारली. सूर्याच्या या खेळीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सूर्याने टी20 मुंबई लीग 2026 स्पर्धेतील 12 व्या सामन्यात 6 जून रोजी ट्रायम्फ नाईट्स मुंबईकडून खेळताना फटकेबाजी केली. सूर्याने मैदानात चौफेर फटकेबाजी करत प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांची धुलाई केली. विशेष म्हणजे सूर्याने नवनियुक्त कर्णधार श्रेयस अय्यर याच्या संघाविरुद्ध ही खेळी केली.

सूर्याची फटकेबाजी

या सामन्यात ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्ट विरुद्ध सोबो मुंबई फाल्कन्स आमनेसामने होते. सूर्याने ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्टकडून खेळताना श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वातील टीम विरुद्ध ही खेळी साकारली. सूर्याने या सामन्यात मैदानात उतरताच सुरुवातीपासूनच टॉप गिअरमध्ये बॅटिंग करत गोलंदाजांचा समाचार घेतला.

सूर्याची तडाखेदार खेळी

View this post on Instagram

A post shared by T20 Mumbai (@t20mumbai)

सूर्याने या सामन्यात 200 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. सूर्याने 24 बॉलमध्ये 48 रन्स केल्या. सूर्याने या खेळीत 3 चौकार आणि 4 षटकार लगावले. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना सूर्याचा जुना अंदाज पाहायला मिळाला. सूर्याच्या या खेळीमुळे टीमला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 147 रन्सपर्यंत मजल मारता आली.

श्रेयसची विजयी खेळी

श्रेयस अय्यर याने विजयी धावांचा पाठलाग करताना प्रमुख योगदान दिलं. श्रेयसने 36 बॉलमध्ये 61 रन्स केल्या. श्रेयसने या खेळीत 5 चौकार आणि 4 षटकार लगावले. श्रेयसच्या या खेळीमुळे सोबो मुंबई फाल्कन्सने 5 विकेट्सने विजय मिळवला.

सूर्याच्या संघाचा सलग तिसरा पराभव

दरम्यान सूर्याच्या नेतृत्वात ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्टने शनिवारी पराभवाची हॅट्रिक पूर्ण केली. ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्ट टीमचा हा या मोसमातील सलग आणि एकूण तिसरा पराभव ठरला. सूर्याची टीम पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटी अर्थात आठव्या स्थानी विराजमान आहे.

Follow Us
बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद
Uddhav Thackeray | बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद; प्रत्येकासाठी 10 लाखांची पॉलिसी जाहीर
पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल ठाकरेंचा इशारा
Uddhav Thackeray | पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल! उद्धव ठाकरेंचा सज्जड इशारा
विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले!
Sanjay Gaikwad | विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले! संजय गायकवाडांविरोधात आरती आंबींची पोलिसांत तक्रार दाखल
पुण्याच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिक शहर निर्मितीचे फडणवीसांच
पुण्याला वेगवान गतिशीलता असलेलं शहर बनवणार
नागपुरात डीजेच्या आवाजावर पोलीस ॲक्शन मोडवर
नागपुरात डीजेवरील बंदीनंतर पहिली कारवाई
आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
बापटांची मराठी ट्रेंडिंग-सीएम फडणवीस
'बापटांची मराठी ट्रेंडिंग,मला ट्यूशनच घ्यावी लागेल'-सीएम फडणवीस
शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! काकडेंच्या दौऱ्याने...
NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray | बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल