T20 World Cup 2021: बटलरचं झंझावती शतक, इंग्लंडची विजयासह सेमी फायनलमध्ये एन्ट्री, श्रीलंका स्पर्धेबाहेर

| Updated on: Nov 02, 2021 | 12:50 AM

जोस बटलरने दमदार शतक ठोकत संघाचा विजय पक्का केला आहे. विशेष म्हणजे या विजयासह इंग्लंडने सेमीफायनलमध्येही धडक घेतली आहे.

T20 World Cup 2021: बटलरचं झंझावती शतक, इंग्लंडची विजयासह सेमी फायनलमध्ये एन्ट्री, श्रीलंका स्पर्धेबाहेर
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका
Follow us on

T20 Cricket World Cup 2021: इंग्लंड क्रिकेट संघाने टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) स्पर्धेत सलग चौथा विजय मिळवला आहे. यष्टीरक्षक जोस बटलरने (Joss Butller) दमदार शतक ठोकत इंग्लंडचा विजय पक्का केला. त्यामुळे इंग्लंडने श्रीलंका संघाला 26 धावांनी मात देत विजय मिळवला आहे. ग्रुपमध्ये सर्वाधिक विजय मिळवत सेमीफायनलमध्येही एन्ट्री श्रीलंका संघाने निश्चित केली आहे. प्रथम फलंदाजी करत बटलरच्या नाबाद 101 धावांच्या जोरावर इंग्लंडने 163 धावा केल्या. ज्या करताना श्रीलंकेचे सर्व गडी 137 धावांवरच सर्वबाद झाले. ज्यामुळे 26 धावांनी श्रीलंकेचा संघ पराभूत झाला. स्पर्धेत तिसरा पराभव मिळाल्यामुळे श्रीलंकेचं पुढील फेरी पोहचण्याचं स्वप्नही धुळीस मिळालं आहे.

सामन्यात नाणेफेक जिंकत श्रीलंकेने सर्व संघ करत असल्यालप्रमाणे प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडला कमी धावात बाद करुन नंतर टार्गेट पूर्ण करु असा विचार श्रीलंका संघाने केला. पण या स्वप्नाच्या मध्ये जोस बटलर आला. त्याने 67 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकार ठोकत नाबाद 101 धावा केल्या. कर्णधार मॉर्गनने 40 धावांची साथ दिल्यामुळे इंग्लंडने स्कोरबोर्डवर 163 धावा लावल्या.

श्रीलंका 26 धावांनी पराभूत

164 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंका संघाची सुरुवातच खराब झाली. सलामीवीर स्वस्तात माघारी परतले. असलंकाने 21, कर्णधार शनाका आणि भानुपक्षा यांनी प्रत्येकी 26 धावा केल्या. तर सर्वाधिक वानिंदू हसरंगाने 34 धावा कुटल्या. पण तोही बाद झाल्यानंतर पुढील फलंदाज लक्ष्यापर्यंत पोहचू शकले नाहीत, 137 धावांवर संघ सर्वबाद झाल्यामुळे श्रीलंका 26 धावांनी पराभूत झाली.

इतर बातम्या

T20 World Cup 2021: 2 पराभवानंतरही भारताची सेमी-फायनलची आशा शिल्लक, वाचा कशी?

लाईव्ह मॅचदरम्यान विराट कोहलीने मारली पलटी, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ज्याचं कौतुक केलं त्याचीच उडवली थट्टा

IND vs NZ: अश्विनला Playing XI मध्ये स्थान न देणाऱ्या कोहलीचा बुमराहकडून बचाव, सांगितलं संधी न देण्याचं कारण

(T20 World Cup 2021 england beat sri lanka and qualifies for semi final jos buttler smashed a century)