PAK vs IRE: आयर्लंडची 100 पार मजल, पाकिस्तानसमोर 107 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?

PAK vs IRE 1st Innings Highlights: पाकिस्तानने आयर्लंडला सुरुवातीला झटपट झटके देत बॅकफुटवर ढकललं. मात्र आयर्लंडने अखेरच्या क्षणी कमबॅक केलं.

PAK vs IRE: आयर्लंडची 100 पार मजल, पाकिस्तानसमोर 107 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
pakistan cricket team
Image Credit source: Icc X account
| Updated on: Jun 16, 2024 | 10:43 PM

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतून आव्हान संपुष्टात आल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट टीमच्या गोलंदाजांना सूर गवसला आहे. साखळी फेरीतील अखेरचा सामना खेळत असलेल्या पाकिस्तानला आयर्लंडलाने विजयासाठी 107 धावांचं आव्हान दिलं आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेतील 36 व्या सामन्यात आयर्लंड आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा वर्ल्ड कप मोहिमेतील शेवटचा सामना आहे. या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध आयर्लंडने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 106 धावा केल्या. आता पाकिस्तान हा सामान जिंकणार की आयर्लंड विजयाने निरोप घेणार? हे लवकरच स्पष्ट होईल.

आयर्लंडची बॅटिंग

टॉस गमावून बॅटिंगसाठी आलेल्या आयर्लंडची पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर घसरगुंडी झालेली पाहायला मिळाली. आयर्लंडच्या पहिल्या 5 पैकी दोघांना भोपळा फोडता आला नाही. तर तिघांनी 1, 2 आणि 7 अशा धावा केल्या. त्यामुळे आयर्लंडची स्थिती 5 बाद 28 अशी झाली. मात्र त्यानंतर आयर्लंडने काही अंशी ठिकठाक कमबॅक केलं. त्यामुळे आयर्लंडला पाकिस्तानसमोर सन्मानजक 3 आकडी आव्हान देता आलं.

जॉर्ज डॉकरेल 11, गॅरेथ डेलेनी 31, मार्क एडेअर 15 आणि बॅरी मॅककार्थी याने 2 धावा केल्या. तर जोशुआ लिटील आणि बेंजामिन व्हाईट ही जोडी नाबाद परतली. जोशुआने नाबाद 22 धावा केल्या. तर बेंजामिनने 5 धावा जोडल्या. तर पाकिस्तानकडून शाहीन अफ्रिदी आणि इमाद वसी या जोडीने प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद आमिरने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर हरीस रौफच्या खात्यात 1 विकेट गेली.

पाकिस्तानसमोर विजयासाठी 107 धावांचं आव्हान

आयर्लंड प्लेइंग ईलेव्हन: पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल आणि बेंजामिन व्हाइट.

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन: बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सॅम अयुब, फखर जमान, उस्मान खान, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, अब्बास आफ्रिदी, हरिस रौफ आणि मोहम्मद अमीर.