AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026: पाकिस्तानचा गेम ओव्हर! आयसीसीचा एक निर्णय पडणार इंग्लंडच्या पथ्यावर

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीचे सामने सुरू आहे. आता पहिल्या टप्प्यातील सामने संपले असून दुसऱ्या टप्पा सुरू होणार आहे. त्यामुळे पाकिस्तानची धाकधूक वाढली आहे. कारण पहिला सामना ड्रॉ झाला आणि दुसऱ्या सामन्यापूर्वी आयसीसीचा निर्णय डोकेदुखी ठरणार आहे.

T20 World Cup 2026: पाकिस्तानचा गेम ओव्हर! आयसीसीचा एक निर्णय पडणार इंग्लंडच्या पथ्यावर
T20 World Cup 2026: पाकिस्तानचा गेम ओव्हर! आयसीसीचा एक निर्णय पडणार इंग्लंडच्या पथ्यावरImage Credit source: Icc X account
| Updated on: Feb 23, 2026 | 6:07 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील गट 2 मध्ये इंग्लंडची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा दारूण पराभव केला. त्यानंतर आता पाकिस्तानचं आव्हान असणार आहे. खरं तर हा सामना पाकिस्तानसाठी शेवटचा सामना ठरू शकतो. कारण या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला तर उपांत्य फेरीचं गणित काही जुळणार नाही. पण पाकिस्तान या सामन्यात पराभूत होण्याची शक्यता आहे. अशी शक्यता वर्तवण्याचं कारण म्हणजे आयसीसीचा निर्णय.. हा निर्णय इंग्लंडच्या पथ्यावर पडेल, तर पाकिस्तानसाठी अडचणीचा ठरणार आहे. पाकिस्तान इंग्लंड यांच्यातील दुसरा सामना श्रीलंकेच्या पल्लेकेले येथे होणार आहे. या सामन्यासाठी आयसीसीने नवी खेळपट्टी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ही खेळपट्टी पाकिस्तानसाठी पराभवाचं कारण ठरू शकते. ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करणारी असणार आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पाकिस्तानचे सर्व सामने हे श्रीलंकेत होत आहेत. त्यामुळे तिथल्या वातावरण आणि फिरकी खेळपट्टीशी जुळवून घेतलं आहे. भारताविरूद्धचा सामना वगळता इतर सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. पण पल्लेकेलेच्या नव्या खेळपट्टीवर गोलंदाजांना स्विंग आणि बाउन्स मिळू शकतो. त्यामुळे पाकिस्तानला अडचणीचं ठरेल. कारण अशा इंग्लंडचे फलंदाज चांगली कामगिरी करू शकतात. त्यांना अशा खेळपट्टीवर खेळण्याचा चांगला अनुभव आहे. गोलंदाज आणि फलंदाज आरामात या खेळपट्टीवर खेळू शकतात. त्या उलट पाकिस्तानचं आहे. पाकिस्तानचा संघ फिरकीवर अवलंबून आहे. फिरकीपटू ही पाकिस्तानची ताकद आहे. त्यामुळे जर खेळपट्टी बदलली तर पुढचा सामना हा पाकिस्तानसाठी शेवटचा ठरू शकतो. कारण फलंदाजांना फलंदाजी करताना अडचण येईल. तसेच गोलंदाजही फॉर्मात नाहीत.

पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, सुपर 8 फेरीतील मंगळवारी होणाऱ्या सामन्यासाठी आयसीसीने नवी खेळपट्टी तयार केली आहे. यामुळे इंग्लंडला थेट फायदा होईल. हा सामना पाकिस्तानला करो या मरोची लढाई आहे. जर या सामन्यात पराभव झाला तर स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागेल. कारण पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे पदरी फक्त एक गुण पडला आहे. त्यात या सामन्यात पराभव झाला तर फार तर 3 गुण होतील. 3 गुणांवर उपांत्य फेरी गाठता येणार नाही.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी