T20 World Cup 2026 : उपांत्य आणि अंतिम फेरीच्या सामन्याची तिकीट विक्री सुरू, अशी खरेदी कराल

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. साखळी फेरीचे सामने संपले असून सुपर 8 फेरीची लढत सुरू आहे. त्यानंतर उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने होतील. बाद फेरीचे सामने तुम्हाला स्टेडियममध्ये बसून पाहायचे आहेत का? जाणून घ्या कसे खरेदी करायचे ते..

T20 World Cup 2026 : उपांत्य आणि अंतिम फेरीच्या सामन्याची तिकीट विक्री सुरू, अशी खरेदी कराल
T20 World Cup 2026 : उपांत्य आणि अंतिम फेरीच्या सामन्याची तिकीट विक्री सुरू, अशी खरेदी कराल
Image Credit source: ICC Twitter
| Updated on: Feb 24, 2026 | 8:04 PM

आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेंमींना सामने स्टेडियममध्ये बसून पाहण्याची संधी आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमी या स्पर्धेतील प्रत्येक सामना स्टेडियममधून पाहण्यासाठी धडपड करत आहे. या स्पर्धेतील बहुतांश सर्वच सामन्यात गर्दी पाहायला मिळाली आहे. आता बाद फेरीतील सामने स्टेडियममध्ये पाहण्याची इच्छा क्रीडाप्रेमींची आहे. यासाठी तिकीटं कुठे मिळणार आणि कशी नोंदणी करायची यासाठी धडपड सुरू झाली आहे. उपांत्य फेरीचा सामना 4 आणि 5 मार्च रोजी होणार आहे. तर अंतिम फेरीचा सामना 8 मार्चला होणार आहे. पहिला उपांत्य सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियम किंवा कोलकात्याच्या प्रतिष्ठित ईडन गार्डन्समध्ये तरंगत्या जागेवर खेळवला जाईल. सुपर 8 फेरीतील संघांवर ठिकाण निश्चित केलं जाईल. तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना वानखेडेवर होणार आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी उशिरा प्रसिद्ध केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे, बाद फेरीच्या सामन्यांची तिकिटे 24 फेब्रुवारी, मंगळवार रोजी संध्याकाळी 7 वाजल्यापासून उपलब्ध होतील असे सूचित केले आहे. पहिल्या आवृत्तीत तीन सामन्यांसाठी प्रत्येक श्रेणीतील तिकिटांचे प्रारंभिक वाटप केले जाईल आणि सर्व तिकिटे tickets.t20worldcup.com वर खरेदी करण्यासाठी उपलब्ध असतील. भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका हे उपांत्य फेरी गाठतील की नाही अशी स्थिती सध्या आहे.

पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला, तर उपांत्य फेरीचा पहिला सामना हा कोलंबोत होईल. हा सामना 4 मार्च रोजी कोलंबो येथे होईल. पाकिस्तानशिवाय श्रीलंका पात्र ठरला आणि गतविजेत्या भारताव्यतिरिक्त दुसरा संघ असेल तर सामना असेल कोलंबो येथे होईल. त्यामुळे तिकीट विक्रीनंतर पैसे परत देण्याची तयारी ठेवली आहे. जर पहिला उपांत्य फेरीचा सामना आणि अंतिम सामना ठरलेल्या ठिकाणी झाला नाही तर तिकीटधारकांना त्यांचे पैसे परत केले जातील.