
Shubman Gill Controversy T20 World Cup 2024: T20 विश्वचषकात कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सुपर-8 मध्ये पोहोचला आहे. भारताला शनिवारी कॅनडाविरुद्ध शेवटचा साखळी सामना पावसामुळे झाा आहे. आता साखळी सामन्यांच्या फेरीनंतर रोहित ब्रिगेड पुढील फेरीसाठी वेस्ट इंडिजला रवाना होईल. मात्र, राखीव खेळाडूंच्या यादीत समावेश असलेला फलंदाज शुभमन गिल मायदेशी परतणार असल्याची चर्चा आहे. गिलच्या भारतात परतण्यामागे एक मोठे कारण असल्याचे सांगितले जात आहे. शुभमन टीम इंडियासोबत अमेरिकेत तर गेला परंतु रोहित शर्मा अन् इतर खेळाडूंचे समर्थन करताना दिसला नाही. अन्य राखीव खेळाडू रिंकू सिंह, आवेश खान आणि खलील अहमद न्यूयॉर्कमध्ये 9 जून रोजी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्या दरम्यान टीमचे मनोबल वाढवताना दिसले.
बातम्यांनुसार शुभनम गिल आता भारतात परतणार आहे. त्याचे खरे कारण शिस्तभंग असल्याचे म्हटले जात आहे. कारण शुभमन गिल अमेरिकेत टीमसोबत अजिबात दिसला नाही. तो संघापासून दूर वेळ घालवत होता. कदाचित त्याच्या इतर व्यवसायात व्यस्त होता. गिल अन् रोहित शर्मा यांच्यात संघर्ष सुरु असल्याच्या बातम्या आहे. गिलने इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केल्याची चर्चा आहे.
दरम्यान बीसीसीआयच्या एक अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, शुभमन आणि आवेश यांना अमेरिकेतील ग्रुप लीगपर्यंतच राहायचे होते. हे आधीच ठरलेले होते. त्यामुळे आयर्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर त्याला संघातून रिलीझ केले जाईल. आता सुपर 8 भारताचा 20 जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. भारत दुसरा सामना 22 तारखेला आणि तिसरा सामना 24 तारखेला खेळणार आहे.
गेल्या एकदिवसीय विश्वचषकात शुभनम गिल याने चांगली कामगिरी केली होती. मात्र टी-२० विश्वचषकाच्या मुख्य संघात यावेळी त्याला स्थान मिळाले नाही. राखीव खेळाडू म्हणून तो भारतीय संघासोबत अमेरिकेला गेला आहे. मात्र, सामना खेळाला नाही.
24 वर्षीय शुभमन गिल याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत भारतासाठी 25 कसोटी, 44 एकदिवशीय आमि 14 टी20 सामने खेळाला आहे. त्यात कसोटी सामन्यांमध्ये 1492, एकदिवशी सामन्यात 2271 आणि टी20 मध्ये 335 धावा केल्या आहेत.