IND vs IRE: पृथ्वी शॉ कुठे गायब झाला? IPL गाजवणाऱ्या एका खेळाडूवर BCCI कडून अन्याय

| Updated on: Jun 16, 2022 | 10:09 AM

आयर्लंड विरुद्धच्या T 20 सीरीजसाठी BCCI ने संघाची घोषणा केली आहे. 17 सदस्यीय संघाचं नेतृत्व हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आलं आहे. टीम मध्ये IPL स्टार राहुल त्रिपाठीला पहिल्यांदा संधी देण्यात आली आहे.

IND vs IRE: पृथ्वी शॉ कुठे गायब झाला? IPL गाजवणाऱ्या एका खेळाडूवर BCCI कडून अन्याय
Team India
Image Credit source: AFP
Follow us on

मुंबई: आयर्लंड विरुद्धच्या T 20 सीरीजसाठी BCCI ने संघाची घोषणा केली आहे. 17 सदस्यीय संघाचं नेतृत्व हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आलं आहे. टीम मध्ये IPL स्टार राहुल त्रिपाठीला पहिल्यांदा संधी देण्यात आली आहे. पण त्याचवेळी काही असे खेळाडू सुद्धा आहेत, ज्यांची टीम इंडियामध्ये संधी मिळण्याची प्रतिक्षा अजून संपलेली नाही. अशा खेळाडूंमध्ये गोलंदाज मोहसीन खान, पृथ्वी शॉ (prithvi Shaw) आणि ऑलराऊंडर राहुल तेवतियाचा (Rahul tewatia) समावेश होतो. बीसीसीआयने आयर्लंड सीरीजसाठी दिल्ली कॅपिटल्सचा स्टार ओपनर पृथ्वी शॉ ला संधी दिलेली नाही. शॉ मागच्यावर्षी श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 सीरीजमध्ये खेळला होता. मागची काही वर्ष तो आयपीएलमध्ये खेळतोय. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने 10 सामन्यात 283 धावा केल्या. यात 61 धावा ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. रोहित आणि विराट कोहली सारख्या दिग्ग्जांच्या अनुपस्थितीत पृथ्वी शॉ ला संधी मिळाली पाहिजे होती.

त्याला संधी मिळेल अशी अपेक्षा होती

लखनौ सुपर जायंट्सचा प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त झाल्यानंतर मोहसीन खानला संधी मिळाली होती. त्याने 9 मॅच मध्ये 14 विकेट काढल्या. काही सामन्यात टीमसाठी मॅचविनरची भूमिका बजावली. सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या सीरीजसाठी त्याला संधी मिळाली नव्हती. आयर्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी त्याला संधी मिळेल अशी अपेक्षा होती. पण असं घडलं नाही.

राहुल तेवतियावर अन्याय नाही का?

गुजरात टायटन्सचा स्फोटक फलंदाज राहुल तेवतियाला सुद्धा आयर्लंड सीरीजसाठी संधी मिळालेली नाही. आयपीएलच्या या सीजनमध्ये त्याने जबरदस्त प्रदर्शन केलं आहे. आपल्या फलंदाजीच्या बळावर त्याने गुजरातला अनेकदा अडचणीतून बाहेर काढले. अशक्य वाटणारे सामने जिंकून दिले. शेवटच्या दोन चेंडूत 12 धावांची गरज असताना, राहुल तेवतियाने सलग दोन षटकार खेचून संघाला विजय मिळवून दिला. मागच्या सीजनमध्येही राहुल त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे चर्चेत आला होता. या सीजनमध्येही त्याने लौकीकाला साजेशी कामिगरी केली. फिनिशरचा रोल तो उत्तम निभावू शकतो. अशा खेळाडूकडे बीसीसीआयच्या निवड समितीने दुर्लक्ष केलं. त्याने 16 सामन्यात 217 धावा केल्या. या धावा तुम्हाला कमी वाटतील, पण राहुल तेवतिया अखेरच्या षटकांमध्ये सामना अटी-तटीचा असताना, फलंदाजीला यायचा. तो आणि डेविड मिलर आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे संकटमोचक ठरले होते.