Rohit Sharma : विराट कोहलीनंतर आता रोहित शर्मानेही व्यक्तीगत आयुष्यात मोठा निर्णय घेतला का?

Rohit Sharma : विराट कोहलीनंतर आता रोहित शर्मानेही व्यक्तीगत आयुष्यात मोठा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. अजून याबद्दल काही ठामपणे सांगता येणार नाही. विराट आणि रोहित या बद्दल काही बोलणार नाहीत, तो पर्यंत काही क्लियर होणार नाही.

Rohit Sharma : विराट कोहलीनंतर आता रोहित शर्मानेही व्यक्तीगत आयुष्यात मोठा निर्णय घेतला का?
Rohit Sharma-Virat Kohli
Image Credit source: Getty Images
| Updated on: Aug 01, 2024 | 1:35 PM

वेस्ट इंडिजमधून T20 वर्ल्ड कप जिंकून परतल्यानंतर विराट कोहली बाबत एक बातमी सोशल मीडियावर आगी सारखी पसरली. ही बातमी होती, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लंडनमध्ये स्थायिक झाल्याची. आता अशीच चर्चा रोहित शर्मा बाबतही सुरु झालीय. सोशल मीडियावर रोहित शर्मा भारत सोडू शकतो अशी चर्चा आहे. भारतापासून दूर देशात रोहित स्थायिक होऊ शकतो. ही बातमी किती खरी, किती खोटी हे आताच सांगू शकत नाही. सोशल मीडियावर जी चर्चा आहे, त्यानुसार रोहित शर्मा अमेरिकेत स्थायिक होऊ शकतो. तो न्यू यॉर्कमध्ये राहणार अशी बातमी आहे. पण या बद्दल कुठलीही अधिकृत माहिती नाहीय.

T20 वर्ल्ड कप जिंकून टीम इंडिया भारतात परतली. मुंबईत विजयी रॅली झाल्यानंतर विराट कोहली लगेच लंडनला रवाना झाला. त्यानंतर सोशल मीडियावर ही चर्चा सुरु झाली की, तो लंडनमध्येच स्थायिक होणार आहे. विराट कोहलीला स्टारडमच्या आयुष्यापासून लांब रहायचय हे त्यामागे कारण सांगितलं जातय. त्यानंतर विराट-अनुष्काचे लंडनधून अनेक फोटो समोर आलेत. विराट लंडनमध्येच स्थानिक होणार का? या बाबत कुठलीही अधिकृत माहिती नाहीय. त्या बद्दल आम्ही सुद्धा काही दाव्यानिशी सांगू शकत नाही. सध्या फक्त ही चर्चा सोशल मीडियावरच आहे.

तो पर्यंत काही क्लियर होणार नाही

रोहित शर्मा न्यू यॉर्कमध्येच स्थायिक होण्याचा विचार करत असेल, तर त्यामागे काय कारण असू शकतं. या बद्दल आज काही स्पष्टपणे सांगता येणार नाही. याचं एक कारण तिथे सुरु करण्यात आलेली क्रिकेट अकादमी आहे. पण त्यात किती तथ्य आहे, या बद्दल काही स्पष्टपणे सांगता येणार नाही. विराट आणि रोहित या बद्दल काही बोलणार नाहीत, तो पर्यंत काही क्लियर होणार नाही.