AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICC Rankings: कॅप्टन सूर्याचा रँकिंगमध्ये दबदबा, स्टार फलंदाजाची काही न करता मोठी झेप

Suryakumar Yadav Icc T20i Batting Ranking : न्यूझीलंडच्या एका फलंदाजामुळे टीम इंडियाचा टी 20i कॅप्टन सूर्यकुमार यादव याला आयसीसी रँकिंगमध्ये चांगला फायदा झाला आहे. जाणून घ्या सविस्तर.

ICC Rankings: कॅप्टन सूर्याचा रँकिंगमध्ये दबदबा, स्टार फलंदाजाची काही न करता मोठी झेप
Icc T20i World Cup 2026 Winner Captain Suryakumar YadavImage Credit source: Surya Kumar Yadav X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 25, 2026 | 7:49 PM
Share

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर आता आयपीएलच्या 19 व्या मोसमाचा थरार रंगणार आहे. टी 20i वर्ल्ड कप नंतर क्वचित संघांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आली. त्यामुळे आयसीसी टी 20i रँकिंगमध्ये फार काही बदल झालेला नाही. आयसीसीने बुधवारी 25 मार्च रोजी ताजी रँकिंग जाहीर केली आहे. या रँकिंगमध्ये क्वचित बदल झालाय. तर टीम इंडियाचा टी 20i वर्ल्ड कप विजेता कर्णधार सूर्यकुमार यादव याला रँकिंगमध्ये फायदा झाला आहे. टीम इंडिया टी 20i वर्ल्ड कप फायलननंतर एकही सामना खेळलेली नाही. मात्र त्यानंतरही सूर्याचा दबदबा पाहायला मिळाला आहे.

टी 20i रँकिंगमध्ये टीम इंडियाचा दबदबा

आयसीसीने जाहीर केलेल्या या टी 20i क्रमवारीत टीम इंडियाच्या फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळत आहे. फलंदाजांच्या रँकिंगमध्ये टॉप 10 मध्ये 4 भारतीय आहेत. अभिषेक शर्मा, इशान किशन आणि तिलक वर्मा या तिघांनी आपलं स्थान कायम राखलं आहे. तर कर्णधार सूर्यकुमार यादव याने मोठी झेप घेतली आहे.

टीम इंडियाचा विस्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा आणि इशान किशन पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी कायम आहेत. अभिषेकच्या खात्यात 875 रेटिंग आहेत. तर इशानच्या नावावर 871 रेटिंग पॉइंट्स आहेत. तर तिलक वर्मा 742 रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर आहे.

सूर्याची सातव्या स्थानी झेप

या टी 20i बॅट्समन रॅकिंगमध्ये पहिल्या 6 स्थानात कोणताही बदल झालेला नाही. मात्र त्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्यामुळे बदल झाल आहे. सूर्याला 2 स्थानांचा फायदा झाला आहे. सूर्या नवव्या स्थानावरुन झेप घेऊन सातव्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. मात्र सूर्याला कोणताही सामना न खेळता हा फायदा झाला आहे. त्यामुळे असं कसं झालं? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. आपण त्याबाबतही जाणून घेऊयात.

न्यूझीलंडच्या खेळाडूमुळे सूर्याला फायदा

सूर्याला काहीही न करता फायदा होण्यामागे न्यूझीलंडचा फलंदाज टीम सायफर्ट कारणीभूत आहे. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंड विरुद्धची 5 सामन्यांची टी 20i मालिका 3-2 ने जिंकली. टीम सायफर्ट या मालिकेचा भाग नव्हता. नियमानुसार, सामने असूनही खेळाडू सहभागी नसेल तर त्याचा परिणाम वैयक्तिक रेटिंग पॉइंट्सवर होतो. त्यामुळे टीमच्या खात्यात ताज्या आकडेवारीनुसार 719 रेटिंग पॉइंट्स आहेत. त्यामुळे सायफर्टच्या न खेळण्याचा सूर्याला फायदा झाला आहे.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल