“जे खरं असू शकतं आणि…” Yuzvendra Chahal ची स्टोरी व्हायरल, धनश्रीसोबतच्या घटस्फोटाची चर्चा असताना क्रिकेटर म्हणाला…

Yuzvendra Chahal and Dhanashree Verma Social Media : टीम इंडियाचा क्रिकेटर युझवेंद्र चहल याने इंस्टा स्टोरी पोस्ट केली आहे. चहलने या स्टोरीतून सर्वकाही स्पष्ट केलं आहे.

जे खरं असू शकतं आणि... Yuzvendra Chahal ची स्टोरी व्हायरल, धनश्रीसोबतच्या घटस्फोटाची चर्चा असताना क्रिकेटर म्हणाला...
Dhanshree verma and Yuzvendra Chahal
Follow us
| Updated on: Jan 09, 2025 | 11:59 PM

टीम इंडियाचा स्पिनर युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा या दोघांमध्ये घटस्फोट होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केल्याचा दावा केला जात आहे. या दोघांच्या घटस्फोटच्या चर्चांबाबत दररोज सोशल मीडियावर नवनवीन दावे केले जात आहेत. युझवेंद्र चहलने सोशल मीडियावर या सर्व चर्चा सुरु असताना भावूक इंस्टा स्टोरी पोस्ट केली आहे. चहलची ही स्टोरी व्हायरल झाली आहे. या स्टोरीतून दोघांमध्ये सर्व काही ठीक नसल्याचा अंदात वर्तवण्यात येत आहे.

युझवेंद्र चहलने घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान अनेक पोस्ट केल्या. मात्र चहलने या इंस्टा स्टोरीतून दोघांच्या नात्याबाबत इशारा दिला आहे. चहलने या स्टोरीतून स्वत:ला चांगला खेळाडू, चांगला मुलगा, चांगला भाऊ आणि चांगला मित्र असं म्हटलं आहे. मात्र चांगला पती असा उल्लेख न केल्याने नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच घटस्फोटाच्या चर्चेबाबत चहलने हे खरं असू शकतं आणि नाहीही, असं चहलने इंस्टा स्टोरीतून म्हटलं आहे.

चहलने इंस्टा स्टोरीत काय म्हटलं?

“मी माझ्या सर्व चाहत्यांचा त्यांच्या प्रेमासाठी आणि समर्थनासाठी आभारी आहे, त्याशिवाय मी इथवर पोहचू शकलो नसतो. मात्र हा प्रवास इथे संपलेला नाही. कारण माझा देश, माझी टीम आणि माझ्या चाहत्यांसाठी अजून काही अविश्वसनीय ओव्हर बाकी आहेत. मला एक खेळाडू असण्याबाबत गर्व आहे. तसेच मी एक मुलगा, एक भाऊ आणि एक मित्रही आहे. मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडीबाबत लोकांना असलेल्या जिज्ञासेबाबत समजू शकतो. मी सोशल मीडियावर अशा विषयांवर चर्चा पाहिलीय जे खरंही असू शकतं आणि नाही सुद्धा”, असं चहलने म्हटलंय.

चहलची इंस्टा स्टोरी

चहलचं चाहत्यांना आवाहन

“एक मुलगा, एक भाऊ आणि एक मित्र म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो, की या सर्व चर्चेत सहभागी होऊ नका, त्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबियांना त्रास होत आहे. मला नेहमीच दुसऱ्यांसाठी चांगलं विचार करणं, शॉर्टकटऐवजी कठोर मेहनत करुन यश मिळवणं असं शिकवलं आहे. मी यासाठी कटीबद्ध आहे. मी देवाच्या आशीर्वादामुळे कायमच तुमचं प्रेम आणि समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करेन, मला सहानुभूती नको. लव्ह यू ऑल”, असंही चहलने नमूद केलं.

27 वर्षानंतर दिल्लीत कमळ अन् मोदी ॲक्शन मोडमध्ये, केजरीवालांना इशारा
27 वर्षानंतर दिल्लीत कमळ अन् मोदी ॲक्शन मोडमध्ये, केजरीवालांना इशारा.
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा.
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव.
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल.
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार.
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा.
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.