Team India | टीम इंडियात रोहित आणि विराट या दोघांचे ग्रुप;वर्ल्ड कपआधी उभी फूट? कोचने सांगितलंच

| Updated on: Feb 04, 2023 | 7:47 PM

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या दोघांमध्ये सर्वकाही योग्य सुरु नसल्याची चर्चा काही महिन्यांआधी होती. टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाने या वादाबाबत आपल्या पुस्तकात लिहिलंय.

Team India | टीम इंडियात रोहित आणि विराट या दोघांचे ग्रुप;वर्ल्ड कपआधी उभी फूट? कोचने सांगितलंच
Follow us on

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहली, टीम इंडियाचे आजी माजी कर्णधार अनुभवी खेळाडू. सध्या या दोघांच्या खांद्यावर टीम इंडियाची जबाबदारी आहे. आगामी वनडे वर्ल्ड कपच्या दृष्टीने टीम इंडियाची तयारी सुरु आहे. या वर्ल्ड कपमध्ये या दिग्ग्जांच्या अनुभवाचा युवा खेळाडूंना फायदा होणार आहे. या दोघांनी आतापर्यंत टीम इंडियासाठी खूप योगदान दिलंय. दोघांनी अनेकदा निर्णायक भागीदारी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. मात्र या दरम्यान दोघांमध्ये बिनसल्याचं समोर आलं होतं. आता याबाबत एका पुस्तकात माहिती देण्यात आली आहे.

विराट आणि रोहितमध्ये खटके?

रोहित आणि विराट या दोघांना कर्णधारपदाचा तगडा अनुभव आहे. दोघे एकत्र बटिंग करतात तेव्हा झंझावाती खेळी करतात. मात्र या दोघांमध्ये कायम चांगले संबंध राहिले नाहीत. एक वेळ अशी होती जेव्हा दोघांमध्ये बिनसल्याच्या चर्चा होत्या. दोघांमध्ये काहीच आलबेल नसल्याच्या अफवा पसरल्या होत्या. याचा फटका टीम इंडियाला बसला होता. वनडे वर्ल्ड कप 2019 मध्ये या दोघांमध्ये वादाची ठिनगी पडली.

त्यानंतर विराट कोहली वर्ल्ड कपनंतर 2021 मध्ये कर्णधारपदावरुन पायउतार झाला. त्यानंतरही या दोघांमध्ये खटके उडाल्याचं म्हटलं जात होतं.

हे सुद्धा वाचा

कोचच्या पुस्तकात महत्त्वाची माहिती

विराट आणि रोहितमध्ये खरंच काही बिनसलेलं का? ही अफवा होती की यात खरंच काही तथ्य होतं? याबाबत सर्वांना जाणून घेण्यात उत्सूक आहेत. टीम इंडियाचे माजी फिल्डिंग कोच आर श्रीधर यांनी आपल्या पुस्तकात याबाबतचा उल्लेख केला आहे. आर श्रीधर यांनी आपल्या पुस्तकात रोहित-विराट यांच्यात कसं खटकलं याबाबत सांगितलंय. मात्र प्रकरण हाताबाहेर जाण्याआधी त्तकालिन कोच रवी शास्त्री यांनी सर्व जबाबदारी सांभाळली.

पुस्तकात काय म्हटलंय?

‘कोचिंग बियॉन्ड’ असं आर श्रीधर यांच्या पुस्तकाचं नाव आहे. ” टीम इंडियाचा 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनल सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध पराभव झाला. या पराभवानंतर खऊप काही बदललं. ड्रेसिंग रुममध्ये काय काय झालं याबाबत फार वाईट चर्चा होती. टीम इंडिया रोहित आणि विराट या दोघांचे ग्रुप पडल्याचं आम्हाला सांगण्यात आलं. कोणी सोशल मीडियावर अनफॉलो केलं होतं. तुम्ही पण असंच केलंत तर याचा त्रास होऊ शकतो”, असं या पुस्तकात म्हटलंय.

“आम्ही वनडे वर्ल्ड कपच्या 10 दिवसांनी विंडिज विरुद्धच्या टी सीरिजसाठी यूएसमध्ये गेलो. रवी शास्त्री यांनी सर्वात आधी विराट आणि रोहितला आपल्या रुममध्ये बोलावून चर्चा केली. टीम इंडियात सर्व आलबेल राहण्यासाठी दोघांनी एकमेकांसोबत राहणं आवश्यक आहे. रवी शास्त्रीने सांगितलं की, ‘जे झालं ते मागे सोडून टीमला पुढे नेण्यासाठी एकत्र राहायला हवं'”, असंही या पुस्तकात नमूद केलंय.