AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : भारताला मोठा धक्का, मोहम्मद सिराज आयर्लंड-इंग्लंड टी 20i मालिकेतून बाहेर, कुणाचा समावेश?

Indian Cricket Team : मोहम्मद सिराज अफगाणिस्तान विरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात खेळला. मात्र सिराजला आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या टी 20i मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे.

Team India : भारताला मोठा धक्का, मोहम्मद सिराज आयर्लंड-इंग्लंड टी 20i मालिकेतून बाहेर, कुणाचा समावेश?
Mohammed Siraj Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Jun 09, 2026 | 4:08 PM
Share

टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याला दुखापतीमुळे अफगाणिस्तान विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. विराटच्या जागी यशस्वी जैस्वाल याचा समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर आता आणखी एक खेळाडू टीम इंडियातून बाहेर झाला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या टी 20i मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. सिराजने वर्कलोड मॅनजमेंटमुळे माघार घेतल्याचं बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केलंय. तसेच सिराजच्या जागी कुणाला संधी देण्यात आलीय हे देखील बीसीसीआयने सांगितलं आहे. सिराजच्या जागी प्रसिध कृष्णा याचा समावेश करण्यात आला आहे.

सिराजला दुखापत की आणखी काही? माघार घेण्याचं कारण काय?

मोहम्मद सिराज याने खबरदारी म्हणून मालिकेतून माघारी घेतली आहे. सिराजला डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. सिराजने त्यामुळेच दोन्ही टी 20i मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. सिराजच्या जागी आता दोन्ही मालिकांसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकचं प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रसिध कृष्णा याला संधी देण्यात आली आहे. प्रसिधने नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात गुजरात टायटन्ससाठी मोहम्मद सिराजसह उल्लेखनीय कामगिरी केली होती.

सिराज आणि प्रसिधची कामगिरी

सिराज आणि प्रसिध या दोघांनी 19 व्या हंगामात गुजरात टायटन्ससाठी बॉलिंगने जबरदस्त कामगिरी केली. सिराजने 17 सामन्यांमध्ये 19 विकेट्स मिळवल्या होत्या. तर प्रसिध कृष्णा याने 12 सामन्यांमध्ये 16 विकेट्स घेतल्या होत्या.

कर्णधार श्रेयसची पहिलीच मालिका

दरम्यान श्रेयस अय्यर आयर्लंड विरूद्धच्या टी 20I मालिकेतून कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे. उभयसंघात एकूण 2 टी 20I सामने होणार आहेत. तर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील टी 20i मालिकेत 5 सामन्यांचा थरार रंगणार आहे.

सिराजची दोन्ही मालिकांमधून माघार

आयर्लंड विरुद्ध इंग्लंड टी 20I मालिकेसाठी भारताचा सुधारित संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटीकपर), इशान किशन (विकेटकीपर), शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स सोहळा यादव, कृष्णा यादव आणि कृष्णा यादव.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...