Team India | टीम इंडियाच्या 2 हुकमाच्या खेळाडूंची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड

| Updated on: Mar 21, 2023 | 10:56 PM

टीम इंडियाचे अनेक खेळाडू हे दुखापतीमुळे संघातून बाहेर आहेत. मात्र 2 मॅचविनर खेळाडू हे गेल्या अनेक महिन्यांपासून दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहेत. मात्र आता या खेळाडूंची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी निवड झालेली आहे. यामुळे क्रिकेट चाहते आनंदी आहे.

Team India | टीम इंडियाच्या 2 हुकमाच्या खेळाडूंची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड
Follow us on

मुंबई | टीम इंडिया सध्या ऑस्ट्रलिया विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. ही एकूण 3 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया 1-1 ने बरोबरीत आहे. तर तिसरा आणि निर्णायक सामना हा 22 मार्च रोजी चेन्नईत खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाचे अनेक खेळाडू हे दुखापतग्रस्त असल्याने ते बाहेर आहेत. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत आहे. त्यामुळे त्यांना आयपीएलच्या आगामी 16 व्या मोसमातही खेळता येणार नाही. तसेच आयपीएलनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामना खेळणार आहे. हा सामना 7 जूनपासून लंडनमधील ओव्हल ग्राउंडवर खेळवला जाणार आहे. हे 2 खेळाडू त्या स्पर्धेत खेळू शकणार की नाहीत, याबाबत संभ्रम आहे. मात्र त्या दरम्यान मोठी बातमी समोर आली आहे.

विस्डन वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपाठी 11 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. विस्डन क्रिकेटकडून ट्विट करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये टीम इंडियाच्या 3 खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये 2 टीम इंडियाचे दुखापतीमुळे बाहेर असलेले खेळाडू आहेत. मात्र त्यांची इथे निवड झाल्याने क्रिकेट चाहते आनंदी आहेत.

विस्डन वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपाठी 11 सदस्यीय संघात टीम इंडियाच्या रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत यांचा समावेश आहे. पंत अपघातामुळे क्रिकेटपासून दूर आहे. त्याला आणखी काही महिने यातून पूर्णपणे फीट होण्यासाठी लागणार आहेत. तर बुमराहही हळूहळू सावरतोय. हे दोघेही टीम इंडियाचे मॅचविनर खेळाडू आहेत. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून हे दोघे टीममधून बाहेर असल्याने टीम इंडियाला मोठा झटका सहन करावा लागतोय.

दरम्यान या 11 जणांच्या टीममध्ये जडेजा, बुमराह आणि पंतव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांचा समावेश आहे. श्रीलंकेकडून दिमुथ करुणारत्ने आणि दिनेश चांदीमल यांची निवड झालीय. तर इंग्लंडकडून जॉनी बेयरस्टो आणि दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा यांना संधी मिळाली आहे.

विजडन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी टीम | उस्मान ख्वाजा, दिमुथ करुणारत्ने, मार्नस लाबुशेन, दिनेश चांदीमल, जॉनी बेयरस्टो, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, पॅट कमिंस, जसप्रीत बुमराह, कगिसो रबाडा आणि नाथन लियोन.